एक्स्प्लोर

JNU Attack | महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाही म्हणून आम्ही सुरक्षित : अनुराग कश्यप

दिल्लीतील जेएनयूत घडलेल्या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. बॉलिवूड कलाकारही आता रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध करताना दिसून येत आहे. दरम्यान, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने या घटनेवरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबई : मी महाराष्ट्रात असल्याने सुरक्षित आहे, कारण इथं भाजपचं सरकार नाहीये, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याने दिली आहे. दिल्लीतील जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईत आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अनेक बॉलिवूडमधील कलाकार या आंदोलनात सहभागी झाले होते. राजधानी दिल्लीतील जवाहारलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री मुलींच्या होस्टेलमध्ये घुसून काही मास्कधारी गुंडांनी विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत असून आता बॉलिवूडकरही रस्त्यावर उतरले आहेत. ज्या प्रकारे ही घटना घडली आहे, त्यावरुन हा माझा भारत वाटत नाही. मी आभार मानतो की मी महाराष्ट्रात आहे, इथं आम्ही सुरक्षित आहोत. कारण, इथं त्यांचं सरकार नाहीये, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने दिली. तो म्हणाला, मागील पाच वर्षातून यांनी प्रत्येक घटनेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रकारे घटना घडत आहे, त्यावरुन या उच्च स्तरावरुन मॅनेज केल्या आहेत, असा आरोप देखील कश्यपने यावेळी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील वांद्रे येथे बॉलिवूडकर एकवटले. यात अभिनेत्री तापसी पन्नू, कॉमीडीयन कुमाल काम्रा, अभिनेत्री दिया मिर्झा, गोहर खान, जोया अख्तर आदी लोक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. स्वरा भास्कर - रविवारी रात्री जेएनयूत जो हिंसाचार झाला तो निंदणीय आहे. राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठीत विद्यापीठात काही मास्कधारी गुंड मुलींच्या होस्टेलमध्ये घुसून हैदोस घालतात. तिथल्या विद्यार्थी आणि प्राध्यपकांवर हल्ला करतात. या हल्ल्यात 20 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अशा वेळी दिल्ली पोलीस मात्र विद्यापीठाच्या गेटवर तीन तास उभे होते. त्यांना वारंवार तक्रारी येऊनही त्यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने केला आहे. जेएनयूतील व्हिडीओ देशभर व्हायरल होत असून या घटनेविरोधात निषेध होत असल्याचं स्वराने सांगितले. काय आहे घटना? राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मास्कधारी गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशा घोष गंभीर जखमी झाली आहे. यात आयशा घोषसह 20 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जवळपास 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित बातम्या - JNU Protest | गेट वे ऑफ इंडियावरुन आझाद मैदानात हलवल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे JNU Attack | जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP MajhaTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
Embed widget