एक्स्प्लोर

JNU Protest | गेट वे ऑफ इंडियावरुन आझाद मैदानात हलवल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे

जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पोलिसांनी आझाद मैदानावर स्थलांतरित केलं होतं. आझाद मैदानावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं.

मुंबई : जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच आंदोलन आझाद मैदानावर स्थलांतरित केलं होतं. आझाद मैदानावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी निषेध सुरुच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी माझाशी बोलताना सांगितले. दरम्यान, या ठिकाणी आंदोलनाला कुठलीही परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाची या ठिकाणी आंदोलनाला परवानगी नसताना हे आंदोलन सुरू होते. तुम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण, या ठिकाणी नाही. त्यामुळे आंदोलन स्थलांतरित करण्याची विनंती पोलिसांकडून विद्यार्थी संघटनांना करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थी संघटनांनी याला नकार देत आंदोलन सुरुच ठेवले होते. परिणामी पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेत आझाद मैदानात स्थलांतरित केलं. तरीही काही विद्यार्थी गेट वे ऑफ इंडियाच्या आसपास जमा झाली होती. आता हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. म्हणून आंदोलन स्थलांतरित केलं - या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत होती. मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे तुम्ही इथं आंदोलन करू नका, असं आंदोलकांना वारंवार सांगण्यात आले होते. मात्र, तरीही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते म्हणून आम्ही त्यांना आझाद मैदानात हलवल्याची माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान, आंदोलकांना आम्ही ताब्यात घेतलं नसून त्यांना स्थलांतरित केल्याची माहिती पोलीसांनी दिली. आझाद मैदानात आंदोलन करण्याची कायदेशीर परवानगी असून त्याठिकाणी सर्व सुधिवा उपलब्ध असल्याचे पोलीसांनी सांगितले. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हॉस्टेलमध्ये रविवारी (5 जानेवारी)रात्री मास्कधारी हल्लेखोरांनी हैदोस घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाली आहे. रक्ताने माखलेले तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या 20 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू होतं. काय घडलं रविवारच्या रात्री - राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मास्कधारी गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशा घोष गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करतायेत. एक तोंडाला रुमाल बांधलेला गुंड मुलींना धमकावण्याच प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या. संबंधित बातमी : JNU Attack | जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती? JNU Attack : मोदी-शाहांना जे हवं तेच घडतयं : शिवसेना JNU Violence | जेएनयूतील हल्ला पाहून 26/11ची आठवण झाली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget