एक्स्प्लोर
डोंबिवलीत पाण्याची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया
डोंबिवलीत पाण्याची पाईपलाईन फुटल्य़ामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.

ठाणे : डोबिंवलीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. डोंबिवलीतील खंबाळपाड्यापासून सावित्रीबाई नाट्यगृहापर्यंत ही पाईपलाईन जाते. दरम्यान पाईप फुटल्यामुळे डोंबिवली पूर्वेकडील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. आज सकाळी या पाईपलाईनचा एअर व्हॉल्व फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. डोंबिवलीत खंबळपाडा परिसरात फुटलेली ही पाईपलाईन 11 वाजण्याच्या सुमारास दुरुस्त करण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत पाण्याची मोठी नासाडी झाली आहे. पाईपलाईन दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असलं तरीही पुढील सूचना मिळेपर्यंत पाणीपुरवठा बंदच राहणार असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं आहे.
आणखी वाचा























