एक्स्प्लोर

मुंबईतील पूर समस्या हाताळण्यासाठी राज्यात वॉटर ग्रीडची स्थापना करावी : नितीन गडकरी

अतिरिक्त पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागाकडे नेता येईल. शाश्वत उपाययोजना म्हणून मुंबई आणि उपनगरांतील मोठ्या वसाहतींमध्ये पाणी प्रक्रिया केंद्राची स्थापना करता येईल.

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील पुराच्या नियमित संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात 'राज्य वॉटर ग्रीड' ची स्थापना करण्यास सूचवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुधवारी लिहिलेल्या पत्रात गडकरी यांनी सांगितले की, वॉटर ग्रीडची स्थापना केल्यानंतर दुष्काळी भागांमध्ये पाण्याची उपब्धता सुनिश्चित करता येईल. मुंबईत दरवर्षी पुरामुळे प्रचंड नुकसान होते. म्हणून, नुकसान टाळण्यासाठी पुरस्थिती हाताळण्यासाठी एकात्मिक आराखड्याची आवश्यकता आहे, असे गडकरी म्हणाले.

गडकरी पुढे म्हणाले की, नीट नियोजन केले तर पुराचे पाणी, सांडपाणी आणि गटारांतील पाणी ठाण्याकडे वळवता येईल आणि वळवण्यात आलेले पूर्ण पाणी प्रक्रिया करुन धरणात साठवता येईल. हे पाणी जलसिंचन, शहराजवळील उद्योग आणि आसपासच्या फलोत्पादन पट्ट्याला देता येईल. अतिरिक्त पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागाकडे नेता येईल. शाश्वत उपाययोजना म्हणून मुंबई आणि उपनगरांतील मोठ्या वसाहतींमध्ये पाणी प्रक्रिया केंद्राची स्थापना करता येईल.

मुंबईतील पूराची समस्या, नाले व्यवस्थापन, सांडपाणी, पिण्याचे पाणी हे विषय एकमेकांशी संलग्न आणि सुसंगत आहेत, त्यामुळे याविषयी एकात्मिक विचार करण्याची आवश्यकता आहे. ही समस्या केवळ मुंबई शहरापुरती मर्यादीत नाही, त्यामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या समन्वयाने तसेच आंतरराष्ट्रीय सल्लागारांच्या मदतीने राज्य सरकारने तपशीलवार प्रकल्प अहवाल सादर करावा, असं गडकरी यांनी सांगितले.

नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते विकास आणि महामार्ग विभागाची जबाबदारी असल्यामुळे, त्यांनी मुंबईतील सर्व रस्त्यांचे सिमेंट रस्त्यांमध्ये रुपांतर करावे, असे सांगितले. डांबरी रस्ते मुंबईतील पावसात टिकणारे नाहीत, हे सांगत मंत्र्यांनी दोन दशकांपूर्वी बांधलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग अद्यापही सुस्थितीत असल्याचे उदाहरण दिले. याच धर्तीवर, मल:निस्सारण आणि पूराचे पाणी वाहून नेण्यासाठी प्रगत जलवाहिनी प्रणालीसह काँक्रीटचे रस्ते मुंबईत बांधले जाऊ शकतात, असे म्हणाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जल वाहतूक उपक्रमाला पाठिंबा द्यावा, असे गडकरी म्हणाले. मुंबई पोर्ट ट्रस्टने यापूर्वीच जलवाहतूक सेवा आणि समुद्री पर्यटनासाठी योजना आखली आहे, ज्यामुळे मुंबई आर्थिक राजधानी असण्याबरोबरच देशाच्या सागरी वाहतूक आणि पर्यटनाचे केंद्र ठरेल. गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलस्रोत मंत्री जयंत पाटील आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget