एक्स्प्लोर
चार महिन्यांच्या चिमुकल्याची जगण्यासाठी धडपड, हवीय तुमची मदत!
चार वर्षांपूर्वी पोटची मुलगी यकृताच्याच गमावल्यानंतर आता मुलालाही यकृताच्या आजाराने गाठल्याने अर्पिता घाडगे मानसिकदृष्ट्या पार कोलमडून गेल्या आहेत. मुलाला वाचवण्यासाठी विनंती करताना, त्यांच्यातील आईची आर्त हाक समोरच्या व्यक्तीच्या काळजाला भिडतात.
![चार महिन्यांच्या चिमुकल्याची जगण्यासाठी धडपड, हवीय तुमची मदत! Want financial help for Liver Transplant of 4 month old Awighna चार महिन्यांच्या चिमुकल्याची जगण्यासाठी धडपड, हवीय तुमची मदत!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/17142418/avighna-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील चुनाभट्टीत राहणाऱ्या घाडगे कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. अर्पिता आणि शैलेश घाडगे या दाम्पत्याच्या चार महिन्यांच्या मुलाला यकृताच्या आजाराने गाठले आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, चार वर्षापूर्वी घाडगे दाम्पत्याची मुलगी यकृताच्याच आजाराने निधन पावली होती. मुलगी गमावल्याच्या दु:खातून अर्पिता बाहेर पडल्याही नव्हत्या, तोच मुलगाही त्याच आजाराने ग्रस्त झाल्याने घाडगे कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
चार वर्षापूर्वी मुलगी ज्या आजारने वारली, तोच आजार आता मुलाला!
अर्पिता आणि शैलेश घाडगे यांना चार महिन्यांपूर्वी मुलगा झाला. अविघ्न असे त्याचे नाव. अविघ्नला यकृताचा आजार असल्याचे, त्याच्या जन्मानंतर चौथ्या दिवशीच कळले. आपल्या मुलीला ज्या आजाराने प्राण गमवावा लागला, तोच आजारा मुलाला झाल्याने घाडगे कुटुंबीय अस्वस्थ झाले.
चार महिन्यांच्या अविघ्नला यकृताच्या शेवटच्या टप्प्यात असणारा ‘क्रिग्लर नज्जर सिंड्रोम’ या गंभीर आजाराचं निदान झालंय. यकृत प्रत्यारोपणाशिवाय आता पर्याय उरलेला नाही.
आर्थिक चणचण, चिंतेत वाढ!
अविघ्नला वाचवायचं असल्यास यकृत प्रत्यारोपण करावे लागेल. त्यासाठी साडे पंचवीस लाख रुपये एवढी मोठी रक्कम उभी करावी लागणार आहे. घाडगे कुटुंबीयांची आर्थिक स्थिती अगदी बेताचीच आहे. शैलेश घाडगे हे ज्वेलर शॉपमध्ये काम करतात, त्यांना महिन्याकाठी 21 हजार रुपये पगार मिळतो. घरात ते एकटेच कमावत असल्याने, आर्थिक चणचण मोठी आहे.
यकृत प्रत्यारोपणासाठी येणारा खर्च परवडणार नसल्याने घाडगे कुटुंबाने क्राऊड फंडिंगचा मार्ग अवलंबला आहे. मंत्रालयातून त्यांना तीन लाख रुपयांची मदत मिळाली आहे. शिवाय, टाटा ट्रस्ट आणि इतर ठिकाणांहून मदतीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
अविघ्नच्या आईची हृदय हेलावणारी प्रतिक्रिया
चार वर्षांपूर्वी पोटची मुलगी यकृताच्याच गमावल्यानंतर आता मुलालाही यकृताच्या आजाराने गाठल्याने अर्पिता घाडगे मानसिकदृष्ट्या पार कोलमडून गेल्या आहेत. मुलाला वाचवण्यासाठी विनंती करताना, त्यांच्यातील आईची आर्त हाक समोरच्या व्यक्तीच्या काळजाला भिडतात.
माय मेडिकल मंत्रा या वेबसाईटशी बोलताना अर्पिता म्हणाल्या, “आजाराने माझ्या मुलीला माझ्यापासून हिरावून घेतलं. आता माझा मुलगाही त्याच आजाराने ग्रस्त आहे. मी मुलीला गमावलं, मात्र मुलगा गमवायचा नाहीय. कोणी करेल का मदतीचा हात पुढे..माझ्या लेकराला वाचवण्यासाठी”
मुलीला गमावून बसलोय : शैलेश
“माझ्या मुलीला देखील यकृताचा हाच गंभीर आजार होता. हा आजार आनुवांशिक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र त्यावेळी या आजाराबाबत मला जास्त माहिती नव्हती शिवाय तिच्यावर उपचार करण्यासारखी माझी परिस्थिती देखील नव्हती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत या आजारामुळे मी माझ्या मुलीला गमावून बसलो.” असं सांगताना शैलेश घाडगे यांची अविघ्नप्रती असलेली काळजी स्पष्टपणे दिसत होती.
अविघ्न संध्या इन्क्युबिटरमध्ये!
यकृताचा आजार वाढणं अविघ्नसाठी धोकादायक ठरु शकतं. त्यासाठी त्याचे बिलीरुबीन नियंत्रणात राहणं गरजेचं असतं. त्यासाठी अविघ्नला इन्क्युबिटरमध्ये ठेवणं अनिवार्य आहे. एखाद्या रुग्णालयात इन्क्युबिटरमध्ये अविघ्नला ठेवायचे म्हटल्यास खर्च मोठा येतो, जो घाडगे कुटुंबाला परवडणारा नाही. त्यामुळे घरातच पाळण्यात इन्क्युबिटरची व्यवस्था करुन त्यात ठेवण्यात आले आहे.
यकृत दात्याच्या शोधात!
एकीकडे भलीमोठी रक्कम उभारण्याचं आव्हान समोर आहे, दुसरीकडे यकृत प्रत्यारोपणासाठी दात्याचाही शोध घ्यायचा आहे. अशा दोन्ही आव्हानांनी सध्या घाडगे कुटुंबाला घेरलं आहे. दाता भेटल्यास अविघ्नवर चेन्नईतील ग्लोबल रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण सर्जन मोहम्मद रिला हे शस्त्रक्रिया करतील.
हवीय तुमची मदत!
अविघ्नच्या यकृत प्रत्यारोपणासाठी साडे पंचवीस लाखांची रक्कम उभरण्याचे आव्हान घाडगे कुटुंबीयांसमोर आहे. शैलेश आणि अर्पिता या दाम्पत्याने आधीच याच आजारामुळे मुलगी गमावली आहे, आता मुलाला वाचवण्यासाठी ते अथक प्रयत्न करत आहेत, धडपड करत आहेत. तुम्ही-आम्ही अविघ्नच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करु शकतो. ज्यांना मदत करणे शक्य आहे, त्यांच्यासाठी घाडगे बँक अकाऊंट डिटेल्स :
![चार महिन्यांच्या चिमुकल्याची जगण्यासाठी धडपड, हवीय तुमची मदत!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/17142559/Avighna-580x392.jpg)
![चार महिन्यांच्या चिमुकल्याची जगण्यासाठी धडपड, हवीय तुमची मदत!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/17142633/avighana-3.jpg)
- नाव- अर्पिता शैलेश घाडगे
- बॅंक- ICICI बँक
- अकाऊंट नंबर- 169201001847
- IFSC कोड- ICIC0001692
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
करमणूक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)