एक्स्प्लोर

Viral Video : गाडी बुडाली विहिरीत! घाटकोपरमधील गाडी बुडतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल, नेमकं काय घडलं?

मुंबईमधील घाटकोपरच्या (Mumbai Ghatkopar Car)  राम निवास इमारतीच्या अंगणात असलेल्या विहिरीमध्ये पडलेली कार अखेर 12 तासानंतर बाहेर काढण्यात आली आहे. गाडी बुडतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल झाला.

मुंबई :  मुंबईमधील घाटकोपरच्या (Mumbai Ghatkopar Car)  राम निवास इमारतीच्या अंगणात असलेल्या विहिरीमध्ये पडलेली कार अखेर 12 तासानंतर बाहेर काढण्यात आली आहे. या ठिकाणी चाळीस फूट खोल पडलेली ही गाडी बाहेर काढण्यास अखेर यश आले आहे. सकाळपासून या विहिरीमधील लाखो लिटर पाणी उपसल्यानंतर अखेर क्रेनच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली आणि स्थानिकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कारमध्ये एक दोन ते तीन फुटाचा मासा देखील आढळून आला. 

नेमकं काय घडलं होतं 
घाटकोपरच्या राम निवास बिल्डिंगसमोर नौरोजी लेन येथे तपन किरण दोषी यांची मोटार कार चक्क स्लब तोडून खाली भूमिगत केलेल्या विहिरीत पडल्याची घटना आज घडली. गाडी विहिरीवर असलेल्या स्लॅबवर पार्क केली होती. ही गाडी आज सकाळी 8.30 च्या सुमारास गाडी स्लॅब खचल्याने 40 फुट खोल विहिरीमधे पडली. ( Ghatkopar Car sinking in Well) या घटनेत कुणी जखमी वगैरे झालं नाही.  ही गाडी ज्यांची होती त्यांनीच गाडी बुडतानाचा हा व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल झाला. ट्विटरवर घाटकोपर हे नाव देखील या व्हिडीओमुळं ट्रेंडिंगला आलं होतं.  माहितीनुसार घाटकोपरमध्ये या विभागात अश्या प्रकारे अनेक विहिरी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही विहीर देखील खूप वर्ष जुनी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बीएमसीनं काय दिलं स्पष्टीकरण
या घटनेचा व्हिडीओ आल्यानंतर काही यूजर्सनी मुंबई महापालिकेला याबाबत विचारणा केली. यावर BMC नं ट्विट करत सांगितलं की, घाटकोपरमधील कारच्या या घटनेशी महानगरपालिकेचा दुरान्वयानेही संबंध नाही. ही खासगी सोसायटी परिसरातील घटना आहे.  घटनेची माहिती मिळाल्यानंतर या अनुषंगाने मदत कार्य म्हणून महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात येत आहे. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजना तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे, असं बीएमसीनं सांगितलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines  5 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09 PM  05 July 2024 TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा Uncut

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget