एक्स्प्लोर

'ती' वायरल ऑडिओ क्लिप शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नीची नाही

ऑडिओ क्लिप आपण केली नसल्याचं स्पष्टीकरण शहीद मेजर कौस्तुभ राणेंची वीरपत्नी कनिका राणे यांनी दिलं आहे.

मुंबई : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनी काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण पत्करलं. देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या या वीरपुत्राच्या हौतात्म्याचा आदर करण्याऐवजी काही जण या परिस्थितीचा गैरफायदा उठवताना दिसत आहेत. शहीद कौस्तुभ यांच्या पत्नीच्या नावे फेक ऑडिओ क्लिप वायरल करण्यात आली आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावे एक खोटी ऑडिओ क्लिप तयार करुन ती सोशल मीडियावर वायरल करण्याली आहे. त्यामुळे शहीद मेजर कौस्तुभ यांच्या पत्नीसह कुटुंबियांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. मात्र ती ऑडिओ क्लिप आपण केली नसल्याचं स्पष्टीकरण वीरपत्नी कनिका राणे यांनी दिलं आहे. शहीद कौस्तुभ यांच्या निधनाने बसलेल्या धक्क्यातून अद्याप आपण सावरलेलो नाही. अशाप्रकारे पत्र लिहावं किंवा क्लिप तयार करावी असं आमच्या मनातही आलं नाही. कुठलीही ऑडिओ क्लीप तयार करण्याची आपली मनस्थिती नसल्याचं कनिका सांगतात. दुसरीकडे, काही जणांनी सोशल मीडियावर आव्हान करत शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या नावे निधी जमवण्यास सुरुवात केली आहे. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचं सांगत काही जण पैसे उकळत असल्याचं समोर येत आहे. याही प्रकारामुळे शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या कुटुंबीयांना अत्यंत दुःख होत आहे. अशाप्रकारे कुठलाही निधी आपण जमवत नाही. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्याचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न कृपया करु नये, अशी कळकळीची विनंती राणे कुटुंबाने केली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर शहीद कौस्तुभ राणे यांची पत्नीचं मनोगत म्हणून काही मेसेज आणि ऑडिओ क्लिप वायरल होत आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या महिलेचा आवाज शहीद कौस्तुभ राणे यांच्या पत्नीचा नाही. सदर ऑडिओ क्लिप आल्यास ती कोणालाही फॉरवर्ड किंवा शेअर करु नये. शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी बजावलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
Embed widget