एक्स्प्लोर
आता डेडलाईन नाही, निकाल लवकर लागतील, तावडेंची सावध भूमिका
मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी दिलेल्या तीनही डेडलाईन हुकल्यानंतर, आता शिक्षणमंत्री विनोद तावडे डेडलाईन देण्यासाठी घाबरले.
मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी दिलेल्या तीनही डेडलाईन हुकल्यानंतर, आता शिक्षणमंत्री विनोद तावडे डेडलाईन देण्यासाठी घाबरले.
मुख्यमंत्री आणि राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर विनोद तावडेंनी पत्रकार परिषद घेतली.
आता निकालाची डेडलाईन देणार नसून, लवकर निकाल लागतील अशी सावध भूमिका तावडेंनी घेतली. शिवाय सर्व निकाल लागल्यानंतर कुणी दोषी आहे का याची चौकशी करून राज्यपाल कारवाई करतील असंही तावडे म्हणाले.
त्यामुऴे तावडेंच्या अशा भूमिकेमुऴे त्यांनाही विद्यापीठाच्या कारभारावर विश्वास उरला नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.
मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी आधी 31 जुलै, मग 5 ऑगस्ट आणि त्यानंतर 15 ऑगस्ट अशा डेडलाईन्स दिल्या होत्या. मात्र या तीनही डेडलाईन्स मुंबई विद्यापीठाकडून पाळल्या गेल्या नाहीत. अजूनही अनेक विषयांचे निकाल जाहीर होणं बाकी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement