एक्स्प्लोर
Advertisement
PSI Reservation | वंजारी युवक संघटनेचा MPSC कार्यालयात राडा; अधिकाऱ्याला काळं फासण्याचा प्रयत्न
वंजारी युवक संघटनेने आज आरक्षणावरुन लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात गोंधळ घातला. पीएसआय भरतीसाठी जागा राखीव न ठेवल्यानं बोर्डवर अंडी फेकून त्यांनी संताप व्यक्त केला.
मुंबई : पीएसआय भरतीसाठी जागा राखीव न ठेवल्याने वंजारी युवक संघटनेने थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याला काळं फासण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एमपीएससी बोर्डावर अंडी फेकली. अचानक हे आंदोलन झाल्याने कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हे आंदोलन थांबवले.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पीएसआय भरतीसाठी जाहिरात दिली होती. मात्र, राखीव न ठेवल्यानं वंजारी समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी वंजारी युवक संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे कार्यकर्ते दुपारच्या सुमारास अचानक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यलयात घुसले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील बोर्डवर अंडी फेकली. सोबतच तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला देखील काळं फासण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतरही मराठा आंदोलक आक्रमक; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
पंकजा मुंडेंच्या ट्विटची दखल
काही दिवांसापूर्वी भाजप नेत्या आणि माजी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. ही बाब लक्षात आणून दिल्यावर कॅबीनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हा गोंधळ आज पाहायला मिळाला.
वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी 2019 मध्ये मोर्चा
वंजारी समाजाला दोन टक्क्यांऐवजी वाढीव दहा टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ऑगस्ट 2019 मध्ये बीडमध्ये वंजारी समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात महिला, पुरुष, विद्यार्थी, तसंच व्यावसायिक शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले. राज्यातील वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण असून वाढत्या लोकसंख्येमुळे आता या आरक्षणात वाढ करुन ते 10 टक्के करावं ही या मोर्चेकऱ्यांची मागणी होती.
Devendra Fadnavis On Muslim Reservation | मुस्लिम आरक्षणामुळं ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात : फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सांगली
निवडणूक
करमणूक
Advertisement