एक्स्प्लोर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम, 1 वर्षांखालील बालकांना देणार पीसीव्ही लस

बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1 वर्षांखालील बालकांची संख्‍या ही सुमारे दीड लाखापेक्षा अधिक आहे. या सर्व बालकांना आता पीव्हीसी लस दिली जाणार आहे.

मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एक वर्षाखालील बालकांना न्‍युमोनिया आणि इतर न्‍युमोकोकल आजारांपासुन संरक्षण देणारी 'न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सीन' (Pneumococal Conjugate Vaccine / PCV) देण्‍यास लवकरच सुरुवात करण्‍यात येणार आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या आरोग्‍य केंद्रासह दवाखाने आणि रूग्‍णालयांमध्‍ये ही लस मोफत दिली जाणार आहे. 

बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1 वर्षांखालील बालकांची संख्‍या ही सुमारे दीड लाखापेक्षा अधिक आहे. या सर्व बालकांना या लसीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. 

पूर्वतयारीचा भाग म्‍हणून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात येत असुन क्षेत्रीय स्‍तरावर जनजागृती करण्‍यात येत आहे. तसेच लस, सिरींजेस आणि इतर सामुग्रीचे वितरण याची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. यानंतर राज्‍य शासनाच्‍या निर्देशानुसार, बालकांचे प्रत्‍यक्ष लसीकरण सुरु करण्‍यात येईल, अशी माहिती महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

या लसीकरण कार्यक्रमाबाबत महत्‍वाची माहिती अशी की, विस्‍तारीत लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइसिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा व्हायरस, गोवर, रुबेला या आजारावर प्रतिबंधक लस देण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, सदर लसीकरण मोहिमेत आता आणखी एका नवीन लसीचा अंर्तभाव करण्‍यात आला आहे. या लसीचे नाव 'न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सीन' (PCV) असे असुन या लसीमुळे न्युमोकोकल न्युमोनिया आणि इतर  न्युमोकोकल आजारापासून संरक्षण मिळु शकणार आहे.

भारतात सन 2010 मध्ये न्युमोकोकल या आजाराने पाच वर्षांखालील अंदाजे 1 लाख बालमृत्यूंची नोंद झाली होती. तर त्याचवर्षी देशभरात 5 ते 6 लाख बालकांना न्युमोनिया हा गंभीर आजार झाल्याची नोंद देखील झाली होती. स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया या जीवाणूमुळे न्युमोकोकल हा संसर्गजन्य आजार होतो हा आजार म्‍हणजे फुफुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, ताप येतो व  खोकलाही येतो तसेच जर सदर संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्‍यास तर मेंदुज्वर, नुमोनिया सेप्टीसीमीया अशा कारणामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.

या अनुषंगाने भारत सरकारने न्युमोकोकल आजारापासुन बालकांचे संरक्षण करण्‍यासाठी  सार्वत्रिक लसीकरणामध्ये 'न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सीन' (PCV) ही लस उपलब्ध करुन दिलेली आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात 'न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सीन' (PCV) या नवीन लसीचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. यानुसार लवकरच बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतील आरोग्‍य केंद्रे, प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयांमध्‍येही सदर लस मोफत देण्यात येणार आहे.

पीसीव्ही लसीचे वेळापत्रक (Schedule) : 

पीसीव्ही लस तीन डोसमध्ये दिली जाणार आहे. 2 प्रायमरी डोस वयाच्या 6 आठवड्यात, 14 आठवड्यात आणि 1 बूस्टर डोस वयाच्या 9 व्या महिन्यात देण्यात येईल. ही लस बालकांना उजव्‍या मांडीवर स्‍नायुमध्‍ये दिली जाणार आहे. पहिल्या डोससाठी येणार्‍या 1 वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ, रोटा, आयपीव्ही, पेंटा या लसी सोबत देण्यात येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Embed widget