Sanjay Raut: सुरेश धसांना फडणवीसांचा आशीर्वाद', सामना आग्रलेखावरून संजय राऊत स्पष्टच म्हणाले..
पोलिसांवर जनतेचा दबाव आहे. विरोधीपक्षाचा दबाव आहे. पोलिसांनी आणि सीआयडीने केलेल्या आतापर्यंत केलेल्या कारवाईवर आपण विश्वास ठेवला पाहिजे.
Sanjay Raut On Suresh Dhas: बीडच्या संतोष देशमुख प्रकरणानं राज्यात मोठा गोंधळ उडाला असताना फरार आरोपींच्या अटकेची बातमी समोर आली आहे. या प्रकरणावर दरम्यान सुरेश धस यांच्या वक्तव्यांनी राजकीय वातावरण तापलं आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये वारंवार आवाज उठवणारे भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुदर्शन घुले हा केवळ प्यादं आहे, मुख्य आरोपी आका आहे असं म्हटलं आहे. आता यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं असून सुरेश धसांना देवेंद्र फडणवीसांचा आर्शीवाद आहे. धस जे बोलतायत ते फडणवीसांच्या आदेशानुसार होणार नाही. याचा अर्थ गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही बीडमधील दहशतवाद, बंदूकीचं राज्य मोडून काढायचंय.असं ते म्हणाले. (Sanjay Raut)
पोलिसांवर जनतेचा दबाव आहे. विरोधीपक्षाचा दबाव आहे. पोलिसांनी आणि सीआयडीने केलेल्या आतापर्यंत केलेल्या कारवाईवर आपण विश्वास ठेवला पाहिजे.बीडमध्ये आता धस पुरेसे आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस जे बोलतायत ते फडणवीसांच्या आदेशावरूनच असल्याचं संजय राऊत म्हणाले. परभणीतील सुर्यवंशी आणि बीडचे संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळलाय. उद्धव ठाकरे लवकरच दोघांच्याही कुटुंबांना भेटणार आहेत. जेंव्हा सगळ्या आरोपींना अटक होईल तेंव्हा आम्ही कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जाणार आहोत. राजकारणासाठी जाणार नाही. आम्ही वाट पाहतोय आरोपी कधी अटकेत जातात. असंही ते म्हणाले.
सामना आग्रलेखातही फडणवीसांचं कोतूक, त्यांचाही धन्यवाद!
बीडच्या संदर्भात फडणवीसांवर टीका केली. बीडच्या बाबतीतली त्यांनी चांगली पावलं उचचली. परभणीतील सूर्यवंशी आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या दुःखादायक आहेत. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लवकरच उद्धव ठाकरे या दोघांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. दरम्यान, सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचेही धन्यवाद अशी प्रतिक्रिया आली आहे .यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, चांगलंय सामना वाचतायत . सामना वाचणं एक सुंदर सवय . मराठा नंतर सामना हा महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठी तयार झाला .सत्य आणि असत्य काय आहे या भूमिका सामना घेत असतं . देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं त्याचा मी कौतुकही केलं . बीडच्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर टीका केली .त्यानंतर त्या टिकेचा योग्य उपयोग झाला . बीडच्या बाबतीतही त्यांनी नंतर चांगले निर्णय घेतले . मुख्यमंत्री हा कुठल्याही एका पक्षाचा नसतो . राज्याच्या हिताचं कुणीही काम करत असेल तर त्याचा कौतुक करायला हवं . हा व्यक्तिगत उणीदुणी काढण्याचा माध्यम नाही . मागच्या अडीच तीन वर्षात फडणवीसांची पावलं चुकीच्या दिशेने पडत आहेत . त्यांना चुकीच्या लोकांच्या कोंडाळ्यात ते अडकले . त्याचा परिणाम राज्याच्या जनतेवर झाला . असंही राऊत म्हणाले .
हेही वाचा: