एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...म्हणून संजय दत्तला लवकर सोडलं, सरकारचं कोर्टात प्रतिज्ञापत्र
मुंबई: अभिनेता संजय दत्तच्या अडचणी कमी करण्यासाठी आता राज्य सरकार आणि जेल प्रशासन त्याच्या पाठीशी उभे राहिलेत.
संजय दत्त बाबतीत कोणत्याही नियमांचं उल्लंघंन झाले नसून, त्याला जेलमध्ये दिलेली कामे त्याने वेळेत पूर्ण केलीत. तसेच त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती, असं राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राव्दारे हायकोर्टात स्पष्ट केलं.
पण राज्य सरकारच्या या स्पष्टीकरणाला सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी विरोध केला आहे. अशी कोणती कामे आहेत जी संजय दत्त ने वेळेत पूर्ण केली आहेत? त्याची कोणती चांगली वागणूक होती ज्यामुळे त्याची शिक्षा कमी केली? असा सवाल करत राज्य सरकारच्या स्पष्टीकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
संजय दत्तची अशी कोणती चांगली वागणूक आहे ते न्यायालयाला तरी कळू द्या असा सवाल विचारुन न्यायालयाने राज्य सरकार आणि जेल प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी ठेवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement