एक्स्प्लोर

सातव्या वेतनासाठी विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या शिक्षक, अधिकारी , कर्मचारी समन्वय समितीने ही याला पाठींबा दिला असून 28 सप्टेंबरपासून आंदोलनात सहभागी होण्यार असल्याच जाहीर केलं आहे.

मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राज्यातील 14 अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत. एकीकडे अंतिम वर्षाच्या रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 ऑक्टोबरपासून सुरु होत असताना ऑक्टोबर महिन्यात परीक्षा त्यासोबतच निकालाचे काम प्राध्यापकांना करायचे आहेत. तर सध्यस्थितीत बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असताना याचा मोठा फटका महाविद्यालये, विद्यापीठांना बसणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या शिक्षक, अधिकारी, कर्मचारी समन्वय समितीने ही याला पाठींबा दिला असून 28 सप्टेंबरपासून आंदोलनात सहभागी होण्यार असल्याच जाहीर केलं आहे.

28 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या लेखणी बंद आंदोलनात कोणताही कर्मचारी काम करणार नाही अशा सूचना समितीकडून देण्यात आल्या आहेत. या दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत विद्यापीठ, महाविद्यालयात स्वाक्षरी करून आपली उपस्थिती संघटनेने पुरवलेल्या हजेरी पुस्तकावर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी करायची असल्याचे समितीने दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे. महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचारी यांच्या मागण्या रास्त व न्याय असूनही शासनाकडून मात्र याबाबत अन्याय होत असल्याने नाईलाजास्तव हे आंदोलन करावे लागत असल्याचे मुंबई विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक दीपक घोणे यांनी स्पष्ट केले. या अनुषंगाने 28 सप्टेंबरपासून लेखणी बंद व ठिय्या आंदोलन तर 1 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

या आंदोलनाला मुंबई विद्यापीठ शिक्षक संघटनेचा (उमासा ) नैतिक पाठिंबा असला तरी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग यात असणार नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाने अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामधून वगळल्याने राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आवाज बुलंद केला आहे. वेतन आयोगासाठी राज्यभर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यावर शासनाने यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वाासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, शासनाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget