एक्स्प्लोर

राज्यात कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण पैशांसाठी प्लाझ्मा दान करत आहेत?

देणगीदाराच्या कमतरतेमुळे प्लाझ्मा थेरपी महागडी होत आहे. त्यातच प्लाझ्मा थेरपीत फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण पैशांसाठी प्लाझ्मा दान करत असल्याचं गृहविभागाच्या निदर्शनास आलं आहे.

मुंबई : कोरोना उपचारासाठी उपयुक्त असलेल्या प्लाझ्मा थेरपीत फसवणूक होत असल्याची माहिती राज्याच्या गृह विभागाकडून समोर आली आहे. यासंदर्भात गरजू रुग्णांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फत करण्यात आले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार गरजू लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आल्याचे गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे. याविरोधात गृह विभागाने सायबर सेलच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

कशी होऊ शकते प्लाझ्मा थेरपीत फसवणूक? देणगीदाराच्या कमतरतेमुळे प्लाझ्मा थेरपी महागडी होत आहे. राज्यात काही निवडक रुग्णालयात ही उपचार पद्धती करण्यात येत आहे. मात्र गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत असल्याने अनेक जण प्लाझ्मा देणगीदार मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोरोनातून बरे झालेले काही बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आल्याचा गृह खुलासा विभागाने केला आहे.

प्लाझ्मा दान करण्यासाठी कोविडमधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याच्या उद्देशाने बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये गरजू रुग्णांना कडून घेतले जाऊ शकतात. तसेच सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमांवर विविध आमिषांचा वापर करत आहेत. डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माच्या विक्री संदर्भात फसवणुकीची शक्यता असल्याने यापासून सावधान राहण्याचे आणि सर्व संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपी उपचाराबाबत जागरुक राहावे. तसेच प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधताना काळजी घ्यावी आणि नागरिकांनी कोणत्याही कोविड उपचाराच्या सुरक्षित पद्धतींवरच अवलंबून असले पाहिजे, असे आवाहन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

तसेच अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करुन कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्याऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिले आहेत. जर या संदर्भात काही फसवणूक होत असेल तर आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनला कळवावे किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी अशा सूचना देशमुख यांनी केल्या आहेत.

राज्यात कुठे कराल सुरक्षित प्लाझ्मा थेरपी? सध्या कोरोनाशी लढा देत असलेल्या गंभीर आणि अति गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वीच 'प्रोजेक्ट प्लॅटिना' या नावाने जगातील सगळ्यात मोठ्या प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलचा शुभारंभ केला. या प्रकल्पात राज्यातील 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि मुंबईतील बीएमसीचे चार वैद्यकीय महाविद्यालये अशा एकूण 21 केंद्रांवर प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. तसेच प्लाझ्मा थेरपीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी सरकरने www.plasmayoddha.in हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget