एक्स्प्लोर
Advertisement
...तर बाळासाहेबांना सुद्धा आनंद होईल : उद्धव ठाकरे
मुंबई : नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनावल्यानंतर शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. बाळासाहेबांबद्दल मोदींच्या मनात आदर आहे. परंतु सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं, देशाचे पंतप्रधान म्हणून आधी त्यांच्याकडून अपेक्षित आहेत," असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
नोटबंदीला समर्थन देणार नाही तो देशविरोधक : मुख्यमंत्री
नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी दिल्लीला दाखल झालं होतं. त्यावेळी झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी खासदारांना चांगलंच फैलावर घेतलं. "मी जेव्हा वर जाईन, तेव्हा बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन की मी चांगलं काम करुन आलो आहे, तुमची हिंमत होईल का माहित नाही," अशा शब्दात त्यांनी शिवसेना खासदारांना सुनावलं.
सहकारी बँकांना नोटा बदलीची परवानगी नाहीच : जेटली
यानंतर नोटाबंदीविरोधात आक्रमक झालेली शिवसेना नरमली. उद्धव ठाकरे म्हणाले की, "देशात चलनाची चलबिचल सुरु आहे. मी वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर देईन, असं जर मोदी म्हणाले असतील तर त्यांचे सर्वप्रथम आभार. यावरुन बाळासाहेबांबद्दल त्यांच्या मनात आदर असल्याचं दिसतं. परंतु सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देशाचे पंतप्रधान म्हणून आधी त्यांच्याकडून अपेक्षित आहेत. ती जर उत्तर सर्वसामन्यांना मिळाली आणि त्यांचं जीवनमान सुरळीत झालं तर बाळासाहेबांनासुद्धा जास्त आनंद होईल." "पण मी अजूनही टोकाची भूमिका घेतलेली नाही, मला ती घेण्याची वेळ येऊ नये, हीच अपेक्षा आहे," असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.नोटबंदीला समर्थन देणार नाही तो देशविरोधक : मुख्यमंत्री
केंद्र सरकारने जिल्हा बँकेत जुन्या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास परवानगी नाकारली आहे. जिल्हा बँकांना नोटा बदलण्याची परवानगी दिली तर या बँका काळा पैसा पांढरा करण्याचं केंद्र बनतील, असा दावाही अर्थमंत्री अरुण जेटलींनी केला आहे. जिल्हा बँकेवरील बंदीविरोधात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, "जिल्हा बँकांना बंदी घालताय पण दुसरीकडे इस्लामिक बँकांना परवानगी देताय, म्हणजे आपण कुठल्या दिशेने चाललोय तेच कळत नाही."अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement