एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : आरएसएसवाले गच्चीतून देशप्रेम शिकवतात, स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसणाऱ्यांच्या हाती देशाची सूत्रे: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On RSS: आम्हीही हिंदू आहोत, पण भाजपवाले आता दैवतांवरुन भांडण लावण्याचं काम करत आहेत, भाषिक प्रांतवाद करत आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 

मुंबई : ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काडीचाही संबंध नाही अशा लोकांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू झाले तर हे गच्चीतून देशप्रेम शिकवतात असा टोला उद्धव ठाकरे यांनी आरएसएस आणि भाजपला लगावला. दैवतांवरून भांडण लावणारे आता भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करत आहेत असाही आरोप त्यांनी केला. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात पार पडलेल्या ईशान्य मुंबई पदाधिकारी निर्धार शिबीरात उद्धव ठाकरे बोलत होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, "आरएसएसवाले हे गच्चीत काठ्या घेऊन बसतात, त्या काठ्या कपडे वाळत घालायला ठिक आहे. पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू असताना घराच्या गच्चीतून हे देशप्रेम शिकवणारे लोक आहेत. जसा यांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही तसाच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी काही संबंध नाही. ज्यांचा स्वातंत्र्याशी संबंध नाही त्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत."

आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर आहे. तेच कुंभमेळ्यात गेले नाहीत तर आम्ही कसे जाणार? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. छावा चित्रपट आला. त्यामध्ये भाजप वाल्यांचा कर्तृत्व काय? त्यामध्ये तुमचा काय संबंध? आणाजी पंताने भगव्याला डाग लावलेला पाहायला जायचं असेल तर जा असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही

देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "कामाला स्थगिती द्यायला काय उद्धव ठाकरे आहे का? असं विचारणारे फडणवीस हे उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत. आपल्या राज्याचे नुकसान होऊन त्यांच्या मालकाच्या मित्राचे खिसे भरणारे हे उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत."

भाजपवाले दैवतावरून भांडण लावतात

आम्हीही जय श्री राम म्हणतोय. रामावर यांचा काय अधिकार आहे? आम्हाला भाजपमुक्त राम पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, "आम्ही जय श्रीराम म्हणणारच, पण भाजपवाल्यांना जय शिवाजी, जय भवानी म्हणायला लावणार. तुम्ही आता दैवतावरून भांडणे लावताय?" 

भाषिक प्रांतवाद सुरू केला

संघाच्या भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेवरून केलेल्या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरेंनी घेतला. ते म्हणाले की, "गुजरातबद्दल आम्हाला द्वेष नाही. पण हे लोक आता भाषिक प्रांतवाद सुरू करत आहेत. देशामध्ये आम्ही हिंदू आहेत, तर महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत. घाटकोपरची भाषा गुजराती म्हणतात. आम्हाला शिकवू नका. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही यांनी फुट पाडण्याचं काम केलं."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!
मोठी बातमी : प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!
एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतील आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतील आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
Eknath Shinde Shivsena Opration Tiger मोठी बातमी: ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या डिनरला हजर; दोन खासदारांच्या उपस्थितीने ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय!
मोठी बातमी: ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या डिनरला हजर; दोन खासदारांच्या उपस्थितीने ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय!
Gold Silver Price Today: युद्धाच्या छायेत सोन्याची झळाळी फिकी, सोने तब्बल 3200 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या भावातही 11,900 रुपयांची घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर
युद्धाच्या छायेत सोन्याची झळाळी फिकी, सोने तब्बल 3200 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या भावातही 11,900 रुपयांची घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Election: बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई
बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई
Raghav Chadha: देशातील महागाईनं पिचलेल्या 'आम आदमी'च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी
देशातील महागाईनं पिचलेल्या 'आम आदमी'च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी
मोठी बातमी : प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!
मोठी बातमी : प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Case Nashik Crime News: पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
सिंधुदुर्गातील घाटात सिमेंट ट्रक दरीत कोसळला; दुर्दैवी अपघातात बाप-लेकाचा मृत्यू
सिंधुदुर्गातील घाटात सिमेंट ट्रक दरीत कोसळला; दुर्दैवी अपघातात बाप-लेकाचा मृत्यू
एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतील आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतील आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Embed widget