एक्स्प्लोर
श्रेय घ्यायचं असेल तर ‘राम मंदिर’ उभारुन घ्या, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
मुंबई : शिवसेना-भाजपमधील श्रेयवादाची लढाई कमी होताना दिसत नाही. “भाजपला जर श्रेय घ्यायचंच असेल, तर राम मंदिर उभारुन दाखवावं.”, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात भाजपला लगावला.
“भाजपला जर श्रेय घ्यायचंच असेल, तर राम मंदिर उभारुन दाखवावं. एखाद्या स्टेशनला नाव देऊन श्रेय घेऊ नका.” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला. मुंबईतल्या अंधेरीत संगीतकार अनिल मोहिले मैदानाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
काल पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्यात शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमधील श्रेयवादाची लढाई मोठ्या प्रमाणात दिसते आहे. मग राम मंदिर रेल्वे स्थानकाचा मुद्दा असो वा शिवस्मारकाचा.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement