भिवंडीत स्टील वेल्डिंग कारखान्यात सिलेंडरचा स्फोट, दोघांचा मृत्यू तीन जखमी
भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्स येथे स्टील वेल्डिंग कारखान्यात सिलेंडरचा स्फोट झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भिवंडी : तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्स येथे स्टील वेल्डिंग कारखान्यात सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू आणि तीन जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
भिवंडी तालुक्यात सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. प्रेम अनंत भोईर (वय 22 वर्ष) व अक्षय अशोक गौतम (वय 21 वर्षे) असे या स्फोटात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. पारसनाथ कॉम्प्लेक्स परिसरात गोडाऊन पट्ट्यात अनेक छोटे-मोठे कारखाने अवैधरित्या सुरू आहेत. त्यापकी ईजी स्टील वेल्डिंग कारखान्यात कामगार काम करीत असताना अचानकपणे सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज संपूर्ण परिसरात ऐकयला आला एवढेच नव्हे तर त्याचा परिणाम समोरील इमारत तसेच दुचाकीवर ही पाहायला मिळाला.
या स्फोटामुळे कारखान्यात काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचाराकरता मानकोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची प्रोसिजर चालू आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल झाले, या घटनेसंदर्भात अधिक माहिती घेतली असता या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारखान्यात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. तसेच अशा प्रकारच्या अनेक अनधिकृत कारखाने व गोदाम असून नेहमीच अश्या घटना घडत असतात. कामगारांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना केली जात नाही तसेच अग्निरोधक यंत्रणा देखील याठिकाणी नसतात. त्यामुळे अशा अपघातांना कामगारांना नेहमीच सामोरे जावे लागते सध्या या सर्व घटनेचे तपास नारपोली पोलिस करीत आहेत.