एक्स्प्लोर
उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट
उल्हासनगर : मुंबई आणि ठाण्यात शिवसेना-भाजप सत्तास्थापनेसाठी एकत्र आल्यानंतर आता उल्हासनगरात कोणाचा महापौर बनतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजप नंबर वन पक्ष असला, तरी शिवसेनाही जोरदार टक्कर देण्याची चिन्हं आहेत.
उल्हासनगरात 32 जागा जिंकत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र स्पष्ट बहुमत नसल्यानं 11 जागा जिंकणाऱ्या साई पक्षाच्या हातात सत्तेच्या चाव्या आहेत. साई पक्षानं भाजपला समर्थन दिलं असलं, तरी आता सेनेनंही त्यांना महापौरपदाची ऑफर दिली आहे.
ऐनवेळी साई पक्ष कोणाच्या सोबत जाणार याची उत्सुकता कायम आहे. येत्या 5 एप्रिल रोजी उल्हासनगरमध्ये महापौरपदाची निवड होणार आहे.
दुसरीकडे, काहीही झालं तरी महापौर भाजपचाच असेल असा सूर साई पक्षासोबतच टीम ओमी कलानींच्या पक्षानंही आळवला आहे. त्यामुळे महापौरपदी कोणत्या पक्षाचा उमेदवार विराजमान होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
उल्हासनगर महापालिका
- भाजप - 32
- शिवसेना - 25
- काँग्रेस - 1
- राष्ट्रवादी - 4
- मनसे - 0
- इतर – 16
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement