एक्स्प्लोर
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरुद्ध गणेश नाईकांनी दंड थोपटले!

नवी मुंबई : आपल्या धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात आता गणेश नाईक यांनी दंड थोपटले आहे. मुंढेंच्या कारभाराला हुकुमशाहीची उपमा देत, मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांनी दिला आहे.
स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. प्रत्यक्षात तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख न करता गणेश नाईकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. गरज पडली तर मुंढेंविरोधात जेलभरो आंदोलन करू असा इशारा नाईकांनी दिला आहे.
दरम्यान, तुकराम मुंढेंनी नवी मुंबईतल्या अवैध बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नवी मुंबईतले सर्वपक्षीय स्थानिक नेते त्यांच्याविरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळतं आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
पुणे
अहमदनगर
Advertisement
Advertisement


















