एक्स्प्लोर
आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. मनपा सचिव चित्रा बाविस्कर यांच्याकडे दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर, सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्यांच्या सह्या आहेत. हा ठराव मंगळवारी असलेल्या महासभेत मांडण्यात येणार असून तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला प्रस्ताव पास होण्याची शक्यता आहे. सध्या १४ सदस्यांनी प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस, विरोधक शिवसेना नगरसेवकांच्या सह्या आहेत. यामध्ये भाजपाच्या नगरसेविकांच्या सह्या नसल्याने सध्या तरी त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून महापौर , नगरसेवकांचा , लोकप्रतिनिधींचा अवमान होणे , महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे , स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, आदी आरोप ठरावात करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या
आणखी वाचा























