एक्स्प्लोर

TRP Scam Case | अर्णब गोस्वामींच्या याचिकेवर हायकोर्टात नियमित सुनावणीला सुरुवात, अंतरिम दिलासा तूर्तास कायम

एखाद्या कंपनीविरोधात घोटाळ्यात सामिल असल्याचा आरोप कसा होऊ शकतो?, कुठलेही सबळ पुरावे नसल्यानं एआरजी मीडियाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला आरोपी बनवण्यात आलेलं नाही. केवळ आपल्या सोयीनुसार चौकशीला बोलावून छळण्यासाठी हा घाट घातल्याचा आरोपही अर्णब यांच्यावतीनं करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले आहेत.

मुंबई : कथित टीआरपी घोटाळ्याचं सारं कुंभाड हे केवळ अर्णब गोस्वामी यांना गोवण्यासाठीच रचण्यात आलं आहे. असा दावा रिपब्लिक वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या वतीनं हायकोर्टात करण्यात आला आहे. तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या जवळ असलेले आणि मुंबई पोलिसांचे सध्या चर्चेत असलेले अधिकारी सचिन वाझे यांना या प्रकरणाची जून 2020 पासून माहिती होती. मात्र तरिही त्यांनी पुढचे काही महिने काहीच कसं केलं नाही?, असा सवाल करत टीआरपी घोटाळ्याचे प्रभारी तपास अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले आहेत.

त्याचबरोबर एखाद्या कंपनीविरोधात घोटाळ्यात सामिल असल्याचा आरोप कसा होऊ शकतो?, कुठलेही सबळ पुरावे नसल्यानं एआरजी मीडियाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला आरोपी बनवण्यात आलेलं नाही. केवळ आपल्या सोयीनुसार चौकशीला बोलावून छळण्यासाठी हा घाट घातल्याचा आरोपही अर्णब यांच्यावतीनं करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही काही संशयास्पद विधानं केली होती. याप्रकरणी तक्रार कशी आली हे स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. मात्र बार्कनं आपल्या अहवालात याचा कुठेही उल्लेख केला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

मंगळवारपासून मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर अर्णब गोस्वामी यांच्यावतीनं जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी आपला युक्तिवाद सुरु केला आहे. उद्याही यावर युक्तिवाद सुरु राहील, त्यामुळे पुढील निर्देश येईपर्यंत अर्णब गोस्वामी आणि या एआरजी मीडियाच्या इतर कर्मचाऱ्यांना अटकेपासून दिलेलं अंतरिम संरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलं आहे. 

पालघरमधील साधूंची जमावाकडनं झालेली हत्या, कंगाना रणौत प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण या मुद्यांवर राज्य सरकारवर सडकून टिका केल्यामुळेच अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हा सारा बनाव रचल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार हायकोर्टात करण्यात आला आहे. त्यामुळे या कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी अर्णबसह एआरजी आऊटलेअर समुहानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तेव्हा, पोलिसांच्या आरोपपत्राला प्रत्युत्तर म्हणून एआरजी कंपनीने हायकोर्टात 3 हजार पानी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला आव्हान देत तपास सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे चौकशीसाठी देण्याची मागणी करत एआरजी मीडियानं गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget