एक्स्प्लोर

Amit Thackeray Speech: अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?

Amit Thackeray Speech: अमित ठाकरे यांच्या भाषणात एक अनपेक्षित प्रसंग घडला. भाषण सुरू असताना ते अचानक थांबले आणि "मला काय बोलायचं सुचत नाही... मी परत येतो," असे म्हणत व्यासपीठावरून खाली उतरले.

Amit Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNS) 20 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील (Mumbai) रवींद्र नाट्य मंदिरात (Ravindra Natya Mandir) आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) उपस्थित होते. कार्यक्रमात सदस्य नोंदणी अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. अलीकडील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अमित ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

याच कार्यक्रमादरम्यान अमित ठाकरे यांच्या भाषणात एक अनपेक्षित प्रसंग घडला. भाषण सुरू असताना ते अचानक थांबले आणि "मला काय बोलायचं सुचत नाही... मी परत येतो," असे म्हणत व्यासपीठावरून खाली उतरले. काही वेळाने ते पुन्हा व्यासपीठावर आले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपले भाषण पूर्ण केले. या घटनेची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.

Amit Thackeray Speech:  अमित ठाकरे भाषण करता करता अचानक थांबले

अमित ठाकरे म्हणाले की, "ज्या तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातला राजीनामा घेतला, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो, तर मी राजकारणात आलो नसतो. हे मी खूप जाणूनबुजून बोलतो. मी दरवेळेस बोलतो. राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण ते प्रामाणिक आहेत. मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की, तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते, तर मी राजकारणात टिकलो नसतो. जी आंदोलन आपण केली, ती आंदोलने आपण विसरली पाहिजेत, कारण राज्याची परिस्थिती बिकट आहे. नव्याने आपण सुरुवात केली पाहिजे. आणखी वेगळे प्रश्न आपण घेतले पाहिजेत. मला काय बोलायचं सुचत नाही... मी परत येतो," असे म्हणत अमित ठाकरे काही वेळासाठी व्यासपीठावरून खाली उतरले आणि पुन्हा भाषणासाठी आले. 

Amit Thackeray Speech:  राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्यामागे

अमित ठाकरे पुढे म्हणाले की, मी पाठ करून आलेलो नाही. तुम्हा सर्वांना बघून धडकी भरली. आतापर्यंत केलेली कामं विसरून जा. यापुढे आपल्याला काय करायचे आहे हे लक्षात ठेवा. तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. गेल्या आठवड्यात आपण व्हॅनमधून लोकांना बाहेर काढत होतो. विद्यार्थ्यांना बाहेर काढत होतो. हा आत्मविश्वास माझ्यात कुठून आला? मला माहिती आहे की, तुमची ताकद माझ्यामागे आहे आणि राज साहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्यामागे आहे. म्हणून माझ्यात आत्मविश्वास आला. तेव्हा पोलीस देखील शांत होते. काही करत नव्हते. शांत होते, कारण काय? पोलिसांच्या मागे राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक आहेत.

Amit Thackeray Speech: मला तुमची साथ हवीय

राज्यात काय सुरू आहे? आपण भीषण परिस्थिती पाहिली आहे. चंद्रकांत पाटील... चंपा काय बोलले? ते दगड चंपाच्या घरी पाठवा. केंद्रातला राजीनामा आणला, राज्यातला आणायला वेळ लागणार नाही. दिल्लीतील आंदोलनातील एका विद्यार्थी होता, 'मारा, मारा' म्हणणारा. तो नागपूरचा आहे, मुख्यमंत्र्यांच्या शहरातला आहे; पण मुख्यमंत्री त्यावर काहीही बोलले नाहीत. आपण मतदान कशाला करता? विकास व्हावा म्हणून ना? चार वर्षे तुम्हाला मारतात आणि एक वर्ष तुम्हाला मलम लावतात. ज्याला तुम्ही मतदान करता, त्याने पाच वर्षांत काही केलं नाही, तर तुम्ही त्याला बदला. आजपासून आपण सदस्य नोंदणीला सुरुवात करतोय. सदस्य नोंदणी झाल्यावर मला भेटायचं आहे. विद्यार्थी कोणीही असो, मी भेटणार आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र राजसाहेबांना घडवायचा आहे, तो घडेलच. पण, महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी विद्यार्थी संघटना मला बनवायची आहे. मला तुमची साथ हवी आहे," असे देखील अमित ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा 

Sanjay Raut on PM Narendra Modi: पीएम मोदी म्हणाले, मला मुलांना माफ करायचंय, संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोचरी टीका; म्हणाले, ही अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी?

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Sanjay Raut : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, खासदार संजय राऊतांची सर्वात मोठी मागणी; म्हणाले, डॉ. बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली, मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रस्ताव आणला तर...
नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, खासदार संजय राऊतांची सर्वात मोठी मागणी; म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली, मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रस्ताव आणला तर...
Jalna news: गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडून पोहत माघारी निघाला, मध्येच दम लागला अन् सरपंचाचा मुलगा धरणात बुडाला, जालन्यातील हृदयद्रावक घटना
गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडून पोहत माघारी निघाला, मध्येच दम लागला अन् सरपंचाचा मुलगा धरणात बुडाला, जालन्यातील हृदयद्रावक घटना
Rahul Gandhi: राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधान मोदींना डिवचलं; डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन अन् शी जिनपिंग यांचा एकत्रित फोटो पोस्ट करत म्हणाले, 'तडजोड केलेला पंतप्रधान कधीही..'
राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधान मोदींना डिवचलं; डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन अन् शी जिनपिंग यांचा एकत्रित फोटो पोस्ट करत म्हणाले, 'तडजोड केलेला पंतप्रधान कधीही..'

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Jalna news: गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडून पोहत माघारी निघाला, मध्येच दम लागला अन् सरपंचाचा मुलगा धरणात बुडाला, जालन्यातील हृदयद्रावक घटना
गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडून पोहत माघारी निघाला, मध्येच दम लागला अन् सरपंचाचा मुलगा धरणात बुडाला, जालन्यातील हृदयद्रावक घटना
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Embed widget