Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
दोन शिवसेनांमधला सामना हा आता महाराष्ट्रासाठी नवीन विषय राहिलेला नाहीय.... सध्या या दोन राजकीय सेनांमध्ये एक वेगळीच रस्सीखेच पाहायला मिळतेय... आणि या रस्सीखेचसाठी कारणीभूत ठरलेत कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके... अभिजीत दिपकेंना जवळ करण्यासाठी ठाकरेंची शिवेसना आणि शिंदेंची शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये कशी चढाओढ सुरू आहे?... पाहुयात...
अभिजीत दिपके...
या मराठमोळ्या तरूणानं जन्माला घातलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचीच,
सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे...
तरूणाईवर गारूड करणाऱ्या या अभिजीत दिपकेशी जवळीक साधण्यावरून...
त्याच्या संपर्कात राहण्यावरून...
दोन्ही शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय
नीट पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलनाची हाक दिल्यापासून उद्धव ठाकरे बऱ्यापैकी अभिजीत दिपकेंच्या संपर्कात आहेत
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट जंतर-मंतरचं व्यासपीठ गाठलं
याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला सोबत घेत मुंबईसह राज्यभर आंदोलनं केली..
चंद्रकांत खैरेंनी अभिजीत दिपकेच्या घरी जाऊन भेट घेतली तेव्हा देखील फोनवरून उद्धव ठाकरेंशी बोलणं करून दिलं
All Shows
































