एक्स्प्लोर

Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

Satara Kas Plateau Flowers Bloom : मुसळधार पाऊस आणि धुक्याच्या अद्भुत संगमात रानहळद अन् वाय तुरा फुलं फुलल्याचं दिसून आलं. यंदा ऑगस्ट अखेरीस हंगाम सुरू होण्याचा अंदाज आहे. 

सातारा : युनेस्कोच्या 'वर्ल्ड हेरिटेज' (World Heritage) यादीत नोंद असलेल्या साताऱ्याच्या जगप्रसिद्ध कास पुष्प पठारावर (Kaas Pathar) सध्या मुसळधार पाऊस आणि धुक्याचा अद्भुत संगम पाहायला मिळत आहे. फुलांचा अधिकृत हंगाम सुरू होण्यासाठी अद्याप काही दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच, कास पठारावर 'रानहळद' (चवर) आणि 'वाय तुरा' या प्रजातीच्या फुलांचा मोठा बहर आला आहे. रानहळदीच्या पांढऱ्याशुभ्र फुलांमुळे सध्या संपूर्ण कास पठार पांढरी चादर पांघरल्यासारखे सुंदर दिसत आहे.

दरवर्षी कास पठारावर 150 हून अधिक दुर्मिळ व रंगीबेरंगी प्रजातींची फुले फुलतात. यंदा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी फुलांचा मुख्य हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा अंदाज निसर्गप्रेमी आणि कास पठार कार्यकारी समितीकडून व्यक्त केला जात आहे.

Kaas Pathar Tourism Safety : सुरक्षा जाळीचे काम अंतिम टप्प्यात

कास पठारावरील दुर्मिळ वनस्पती आणि फुलांचे पर्यटकांपासून संरक्षण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पठाराच्या दोन्ही बाजूला सुरक्षेसाठी जाळी (Safety Netting) लावण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. पर्यटकांना फुलांचा आनंद घेता यावा आणि वनस्पतींचे नुकसानही होऊ नये, यादृष्टीने कास पठार समितीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.

Nature's Beauty Kaas Pathar : पाऊस आणि धुक्यामुळे निसर्गसौंदर्य बहरले

सध्या कास पठार परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गसौंदर्य अधिकच खुलले आहे. हिरव्यागार गालिच्यावर रानहळदीची पांढरीशुभ्र फुले आणि वाय तुरा फुलांची उधळण पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत.

Kaas Pathar Tourist Season : कास समितीचा विशेष आढावा

हंगामाच्या पार्श्वभूमीवर कास पठार कार्यकारी समितीने सर्व सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला आहे. पर्यटकांची गर्दी नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, गाईड्सची उपलब्धता आणि पठाराचे संरक्षण या सर्व बाबींवर विशेष भर दिला जात असून ऑगस्ट अखेरपासून कास पठार पर्यटकांसाठी पूर्णपणे सज्ज होणार आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Rohit Pawar: '...पण आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करता हे विसरु नये'; आमदार रोहित पवारांचा थेट मंत्री शिवेंद्रराजेंना सल्ला
'...पण आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करता हे विसरु नये'; आमदार रोहित पवारांचा थेट मंत्री शिवेंद्रराजेंना सल्ला
Satara NEET exam death News: नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...
नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...
सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात महाकाय दरड कोसळली, वाहतूक बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात महाकाय दरड कोसळली, वाहतूक बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Embed widget