Amol Kolhe : कोल्हेंकडून वसुलीचा आरोप, मुंबई वाहतूक पोलिसांनी थेट दाखवली त्यांच्या थकीत दंडाची पावती
Traffic Police : अमोल कोल्हे यांच्या वाहनावर 16 हजार 900 रुपयांचा दंड प्रलंबित असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलीये.
मुंबई : वाहतूक पोलिसांना (Traffic Police) प्रत्येक चौकात वसुलीसाठी टार्गेट ठरवून देण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलाय. यावर वाहतूक पोलिसांकडून देखील त्यांना जशास तसं उत्तर देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. कारण वाहतूक पोलिसांनी अमोल कोल्हे यांच्या वाहनावर 16 हजार 900 रुपयांचा दंड प्रलंबित असल्याची माहिती दिलीये. तसेच चालकास थकीत दंड भरण्याची विनंती देखील करण्यात आली होती, असं देखील वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
महोदय, आम्ही चौकशी केली असुन आपले वाहन क्र. MH14 FH - - - - याचेवर दि. २८ डिसेंबर २०१९ ते दि. २ अॅाक्टोबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातिल विविध रस्त्यांवर १५ ई-चलानवरील ₹१६९००/- दंड प्रलंबित असल्यानेच आपले वाहन चालकास थकीत दंड भरण्याची विनंती करण्यात आली होती. https://t.co/QTYsusLuDK pic.twitter.com/V2bAJziSDq
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 2, 2023
अमोल कोल्हे यांनी पोलिसांच्या वसुलीची थेट आकडेवारीच समोर आणली. मुंबईच्या सिग्नलवर आलेला एक अनुभव अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत शेअर केला. ज्यात त्यांनी पोलिसांना प्रत्येक चौकात वसुलीसाठी टार्गेट ठरवून देण्यात येत असल्याचा दावा केलाय. मुंबईतील प्रत्येक चौकात 25 हजार रूपयांची वसुली आणि 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे वाहतूक पोलीस कर्मचारी यांना टार्गेट देण्यात आल्याचे कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.
वाहतूक पोलिसांचे उत्तर
अमोल कोल्हे यांच्या ट्वीटवर वाहतूक पोलिसांनी देखील उत्तर दिलं. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू असून संभ्रम निर्माण करण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीची माहिती घ्यावी असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.
अमोल कोल्हेंचं ट्विट काय?
मुंबईतील वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईवर ट्वीट करत खासदार कोल्हे यांनी म्हटले की, "आजचा धक्कादायक अनुभव!... मुंबईत सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेतली. त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात 25000 रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे आदेश असल्याचे सांगितले असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
वाहतूक सिग्नलवर (Traffic Signal) पोलिसांच्या वसुलीचा अनेकांना अनुभव येतो. मात्र, हाच वसुलीचा फंडा किती भयंकर आहे याचा अनुभव स्वतः राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना आला असून, पोलिसांच्या वसुलीची थेट आकडेवारीच त्यांनी समोर आणली आहे. मुंबईच्या सिग्नलवर आलेला एक धक्कादायक अनुभव कोल्हे यांनी ट्वीट करत शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पोलिसांना प्रत्येक चौकात वसुलीसाठी टार्गेट ठरवून देण्यात येत असल्याचा दावा केला आहे. मुंबईतील प्रत्येक चौकात 25 हजार रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे वाहतूक पोलीस (Traffic Police) कर्मचारी यांना टार्गेट देण्यात आल्याचे कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा :
Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हेंचे वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर ट्वीट; पोलिसांनी म्हटले वस्तुस्थितीची माहिती घ्या...