एक्स्प्लोर
मुंबई-अहमदाबाद हायवेवर धडकेनंतर तीन ट्रक पेटले; दोन जखमी, वाहतूक विस्कळीत
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवारजवळ तीन ट्रकचा भीषण अपघात झाला. यानंतर तिन्ही ट्रकला आग लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवारजवळ तीन ट्रकचा भीषण अपघात झाला आणि तिन्ही ट्रकला भीषण आग लागली आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
गुजरातहून मुंबईकडे जाणारा एक ट्रक विरुद्ध मार्गावरील दोन ट्रकला धडकल्याने हा भीषण अपघात घडला. रात्री साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी असून त्यांना वसईच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सध्या मोठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गुजरातहून मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक मनोरमार्गे वाडा भिवंडी अशी वळवण्यात आली आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement