एक्स्प्लोर
भाजीची हातगाडी लावण्याच्या वादातून तिघांची हत्या
मुंबईतील भांडूपमध्ये भाजीची हातगाडी लावण्याच्या वादातून 3 जणांची हत्या करण्यात आली आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
![भाजीची हातगाडी लावण्याच्या वादातून तिघांची हत्या three persons murder in bhandup latest update भाजीची हातगाडी लावण्याच्या वादातून तिघांची हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/18230157/MUMBAI_Bhandup.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील भांडूपमध्ये भाजीची हातगाडी लावण्याच्या वादातून 3 जणांची हत्या करण्यात आली आहे. भांडूपच्या सोनापूर भागात ही घटना घडली.
आज दुपारच्या सुमारास भांडूपच्या सोनापूर भागातील झकेरीया कंपाऊंडमध्ये भाजीची हातगाडी लावण्याच्या कारणावरून भाजीवाले आणि काही तरूणांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले. या वादातून अब्दुल खान आणि सैबाज खान या दोघांची हत्या झाली होती. तर सादाब खान हा गंभीर जखमी झाला होता.सादाबवर मुलुंडच्या फोर्टीज रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या हत्येप्रकरणी 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हे आरोपी पळून जाताना सीसीटीव्हीत कैदही झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)