एक्स्प्लोर
Advertisement
coronavirus | मिरा रोडमध्ये एकाच घरातील तीनजण पॉझिटिव्ह
तीन दिवसापूर्वी मिरा रोड भागातील नया नगर परिसरात 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलं होतं. हा रुग्ण गेल्या काही काळापासून कर्करोग आणि मधुमेहामुळे त्रस्त होता.
मुंबई : मिरा रोड येथील नया नगर भागात एकाच घरातील तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. त्याच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याच घरातील दोन रुग्णांचा अहवाल अद्यापही आला नाही. मात्र त्यांना देखील लागण झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तीन दिवसापूर्वी मिरा रोड भागातील नया नगर परिसरात 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलं होतं. हा रुग्ण गेल्या काही काळापासून कर्करोग आणि मधुमेहामुळे त्रस्त होता. आठ दिवासापूर्वी त्याला न्युमोनिया झाल्यामुळे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे या रुग्णात आढळून येत असल्यामुळे, खाजगी रुग्णालयाकडून रुग्णाची कोविड-19 तपासणी करण्यात आली. त्या अहवालात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. ही माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेला कळवण्यात आली. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून रुग्णाला तातडीने मुंबई येथील रुग्णालयात नेण्यात आले होते.
Coronavirus | कोरोनावर मात कशी करायची? कोरोनाशी दोन हात केलेल्या रुग्णाशी संवाद
त्यापैकी त्या व्यक्तीच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आले आहे. तर अद्यापही त्या व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयाकडून क्रॉस वेरिफाय रिपोर्ट आलेला नाही. मात्र खाजगी रुग्णालयाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर त्याचा एका मुलाचा अहवाल आला नाही. रूग्णाच्या मुलाला पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केलेलं आहे. घरातील तिघांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने या दोघांचे ही रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार असल्याची शक्यता आहे. तसेच हे कुटुंब ज्या नागरिकांच्या संपर्कात आला त्या नागरिकांचा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. त्या परिसरीतील पाच हजार घर निर्जंतुकीकरण करण्यात आल्याच मिरा भाईंदरचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी माहिती दिली.
आता पर्यंत मिरा भाईंदरमध्ये 657 नागरीक हे परदेशातून आले असून, त्यापैकी 408 नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर 249 नागरिकांना 14 दिवसांच्या तपासणीनंतर घरी सोडण्यात आले. तसंच 373 नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. रोजच या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी पाठवण्यात आलेल्या 17 स्वॅब तपासण्यांमध्ये तीन रुग्ण हे पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.
संबंधित बातम्या :
कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांवर सरकार आणि पालिकेचा फोकस, संपर्कात आलेल्यांना करणार क्वारेंटाईन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement