मुंबई महापालिका लवकरच 'फिव्हर क्लिनिक' सुरु करणार; सर्दी, ताप, खोकल्यावर उपचार
सर्दी, ताप, खोकल्यावर उपचार कण्यासाठी मुंबई महापालिका फिव्हर क्लिनिक सुरु करणारा आहे. महापालिका क्षेत्रातील खाजगी दवाखाने, रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, पॅथॉलॉजी लॅब इत्यादी खुले ठेवण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले आहेत.
मुबंई : ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या आणि कोरोना कोविड 19 सदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींवर उपचार करण्यास अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये लवकरच महापालिकेची 'फिवर क्लिनिक' सुरू होत आहेत.
'कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या 'लॉकडाऊन' मधून खाज़गी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स यांना वगळण्यात आले आहे. त्यांनी या काळात आपल्या सेवा नियमितपणे देणे आवश्यक आहे. मात्र, असे असले तरी अनेक ठिकाणी खाजगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात येत असल्याचे आज झालेल्या एका विशेष बैठकीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स खुले ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी आज दिले आहेत.
राज्यात लागू करण्यात आलेल्या 'साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897' नुसार 'महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020' अन्वये महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश काढण्यात आले आहेत.
या आदेशात नमूद करण्यात आल्यानुसार ताप, सर्दी, खोकला अशी 'कोविड कोरोना 19'ची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींवर वैद्यकीय व आरोग्य विषयक औषध उपचार हे खाजगी दवाखान्यात करण्यात येतील. तर 'कोविड कोरोना 19' ची लागण झाल्यासारखी लक्षणे असणाऱ्या, म्हणजेच ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या व्यक्तींवर महापालिकेच्या दवाखान्यात किंवा महापालिकेच्या रुग्णालयात अथवा महापालिकेने कोरोना विषयक उपचारांसाठी प्राधिकृत केलेल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येतील.
Coronavirus | फेक न्यूज पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा : सर्वोच्च न्यायालय
संबंधित बातम्या :