एक्स्प्लोर
भटक्या कुत्र्याचे पंजे कापले, मीरा-भाईंदरमधील अमानवी कृत्य
मीरा-भाईंदरमध्ये एका भटक्या कुत्र्यांचं लिंग आणि पंजे कापून टाकण्याचा अमानवी प्रकार समोर आला आहे.
![भटक्या कुत्र्याचे पंजे कापले, मीरा-भाईंदरमधील अमानवी कृत्य the unknown person cut off the dog’s paws in mira bhayander latest update भटक्या कुत्र्याचे पंजे कापले, मीरा-भाईंदरमधील अमानवी कृत्य](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/23215409/mum-dog-champion.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मीरा-भाईंदर : भटक्या कुत्र्यांचं लिंग आणि पंजे कापून टाकण्याचा अमानवी प्रकार मीरा-भाईंदरमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. दोन प्राणीमित्रांना हा कुत्रा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ या कुत्र्याला 'अॅनिमल टू मीट' या संस्थेत उपचारासाठी नेलं.
सध्या तिथं त्याच्यावर उपचार सुरु असून, त्याला कृत्रिम पाय बसवण्यात येणार असल्याचं डॉ. अंजली पाठक यांनी सांगितलं. तसच या कुत्र्याचं नाव ‘चॅम्पियन’ असं ठेवण्यात आलं आहे.
‘चॅम्पियन’च्या उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी प्राणीमित्रांनी आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, अभिनेता जॉन अब्राहमने हा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, अशाप्रकारचं कृत्य नेमकं कुणी केलं याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)