एक्स्प्लोर
अनैतिक संबंधाच्या आहारी गेलेल्या मुलाची आईकडूनच हत्येची सुपारी
22 वर्षीय रामचरण द्विवेदी यानं अनेक महिलांशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. या सर्वाची कुणकुण आईला लागताच तिनं आपल्या मुलाचीच हत्या घडवून आणली.
![अनैतिक संबंधाच्या आहारी गेलेल्या मुलाची आईकडूनच हत्येची सुपारी The Mother Sent The Killers To The Murder Of The Son In Vasai Latest Update अनैतिक संबंधाच्या आहारी गेलेल्या मुलाची आईकडूनच हत्येची सुपारी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19081225/vasai-murder.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वसई : वसईत एका आईनं आपल्या 22 वर्षीय मुलाची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या मुलाचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण या महिलेला लागली होती. याच कारणामुळं या तिनं पोटच्या मुलाचीच हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
आरोपी महिलेचं नाव रजनी द्विवेदी असं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 22 वर्षीय रामचरण द्विवेदी यानं अनेक महिलांशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. त्याच्या सर्व कृत्यांना आईवडील कंटाळले होते. यामुळं मोठी बदनामी होत असल्यानं त्यांनी त्याला वारंवार समजावलं देखील होतं. मात्र, त्यानंतर रामचरण आपल्या आईवडिलांनाच मारहाण करत होता.
मयत तरुण रामचरण द्विवेदी
अखेर आरोपी आईनं आपल्या मोठ्या मुलाला हाताशी धरून रामचरणच्या हत्येची सुपारी दिली. आरोपी राकेश यादव आणि केशव मिस्ञी यांनी ही सुपारी घेतली आणि त्यांनी रामचरण याची जानकीपाडा येथील खदानीत हत्या केली.
रामचरणच्या मानेवर धारधार शस्त्रानं वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना बरीच अडचण येत होती. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीनं रामचरणची ओळख पटवत त्याच्या आईसह चौघांना अटक केली.
![मयत तरुण रामचरण द्विवेदी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19081442/Photo-Death-Boy-Ramcharn-diwedi-4.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)