फेसबुकवर दुचाकीचा फोटो टाकल्याने दुचाकी चोर गजाआड
इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये हे दृश्य कैद झाले होते. या बाबत त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सीसीटीव्ही फुटेज मधून या चोराची ओळख पटत नव्हती.
मुंबई : एका चोरट्याने चोरी केलेल्या दुचाकीचा फोटो फेसबुकवर अपलोड केल्यामुळे तो चोर आणि त्या चोरीत शामिल असलेला त्याचा भाऊ नवघर पोलिसांच्या हाती लागला आहे. राहुल गायकवाड आणि त्याचा भाऊ समीर गायकवाड अशी या दुचाकी चोरांची नावे आहेत.
19 सप्टेंबर रोजी मुलुंडच्या हरिओम नगर मधील आदित्य पार्क या इमारती मधून दोन रेनकोट घालून आलेल्या इसमांनी प्रकाश कुबल यांची दुचाकी चोरून नेली होती. इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये हे दृश्य कैद झाले होते. या बाबत त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सीसीटीव्ही फुटेज मधून या चोराची ओळख पटत नव्हती.
दरम्यानच्या काळामध्ये ज्यांच्यावर संशय आहे त्या व्यक्तींची नावे तक्रारदाराने नवघर पोलिसांकडे सोपविली होती. या संशयितांपैकी राहुल गायकवाडने त्याच्या फेसबुक पेजवर या दुचाकीसह फोटो अपलोड केला. या बाबतची माहिती नवघर पोलिसांना कळताच पोलिसांनी राहुल गायकवाड आणि त्याचा भाऊ समीर गायकवाड याला अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे.
Chandrapur Honest Thief चोरी केली पोटासाठी, पण पैशाला हात लावला नाही, चंद्रपुरातील हॉटेलमधील प्रकार!