ठाणे बेकायदेशीर लसीकरण प्रकरण : मीरा चोप्रा पाठोपाठ 'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनचंही नाव
ठाण्यातील बेकायदेशीर लसीकरण प्रकरणी मीरा चोप्रा पाठोपाठ 'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनचंही नाव समोर आलं आहे. सौम्या टंडनचा फोटो असलेलं एक ओळखपत्र समोर आलं आहे.
मुंबई : प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं' मध्ये तब्बल 5 वर्ष अनीता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन अडचणीत सापडली आहे. फ्रंटलाइन वर्कर असल्याचं सांगत ठाण्यातील एका रुग्णालयातून कोरोना लसीकरण केल्याचा आरोप सध्या सौम्या टंडनवर केला जात आहे.
एक ओळखपत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये सौम्या टंडनचा फोटो दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे, या ओळखपत्रात सौम्या टंडन एक फ्रंट लाइन वर्कर असल्याचं नमूद केलं आहे. सौम्या टंडनवर ठाणे पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालयात फ्रंटलाइन वर्कर म्हणून लसीकरण करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या बातमीची दखल घेतली असून ठाणे महानगरपालिकेनं म्हटलं की, या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि सत्य सर्वांसमोर आणलं जाईल.
एबीपी न्यूजनं सौम्या टंडन यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी सौम्यानं हे वृत्त फेटाळून लावत. ही सगळी माहिती खोटी असल्याची सांगितली. एबीपी न्यूजशी बोलताना सौम्यानं सांगितलं की, "मी ठाण्यात त्या ठिकाणाहून लस घेतलीच नाही. समोर आलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे."
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काही दिवसांपूर्वी मीरा चोप्रावरही फ्रंटलाइन वर्कर असल्याचं ओळखपत्र घेऊन लसीचा डोस घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. प्रकरण समोर आल्यानंतर अभिनेत्रीनं सोशल मीडियावर हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं होतं. तसेच हे आरोप निराधार असल्याचंही सांगितलं होतं.
सौम्या टंडन 2015 पासून सीरियल 'भाभीजी घर पर हैं' सुरुवातीपासूनच अनीता भाभीच्या भूमिकेत दिसून आली होती. तिच्या या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. परंतु, 5 वर्षांनी मालिकेत काम केल्यानंतर तिनं ऑगस्ट, 2020 मध्ये मालिकेतून एग्झिट घेतली होती. मालिका सोडण्यासंदर्भात सौम्यानं सांगितलं होतं की, एक अभिनेत्री म्हणून तिला काहीतरी नवं करायचं आहे.
दरम्यान, ठाण्यातील या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये 21 जणांनी बनावट आय कार्ड बनवले होते. मात्र काहींनी लस घेतली होती, त्यांची यादी आहे. या यादीत 17 नावं आहेत, सुपरवाईझर आणि अॅडमीन बनून या लोकांनी बनावट आयकार्ड बनवले आहेत. ओम साई आरोग्य केयर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :