(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | ठाण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 200च्या पुढे; नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आयुक्तांचे आदेश
गुरुवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 201 नवीन covid-19 चे रुग्ण सापडले आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत covid-19 मुळे 1321 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 998 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर आता पर्यंत 58,283 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.
ठाणे : ठाण्यातच covid-19 च्या रुग्ण संख्येने पुन्हा एकदा 200 चा आकडा पार केला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ठाण्यातील covid-19 अशा रुग्णांची संख्या ही 200 पेक्षा कमी होती. किंबहुना गेल्या दोन महिन्यांत ही रुग्ण संख्या एकदाच शंभरच्यावर दिसून आली होती. मात्र काल तब्बल 112 नवीन रुग्ण आढळल्यानंतर आज 201 नवीन रुग्णांची नोंद ठाणे महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा, अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत.
गुरुवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 201 नवीन covid-19 चे रुग्ण सापडले आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत covid-19 मुळे 1321 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 998 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर आता पर्यंत 58,283 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के इतके आहे. असे असले तरी दिवाळी नंतर पहिल्यांदाच संख्येने 200 चा आकडा आज पार केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. लसीकरण आणि नियमांमध्ये मिळालेली शिथिलता यामुळे नागरिक बेफिकीर झाल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेक जण मास्क देखील घालत नसल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात वावरताना मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टिंग पाळणे बंधनकारक करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक ठिकाणी, मार्केट परिसरात मास्क वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेचा मुख्य कोरोना नियंत्रण कक्ष, बेड व्यवस्था, अॅम्ब्युलन्ससह संपूर्ण आरोग्य यंत्रणा तत्काळ पुर्ववत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासोबतच ठाणे जिल्ह्यात देखील पुन्हा एकदा नवीन रुग्णांचा आकडा हा 500 च्या वर गेला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मिळून आज 506 नवीन रुग्ण आढळले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण सहा महानगरपालिका आणि ग्रामीण भाग मिळून ही रूग्णसंख्या सांगितली गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :