मुंबईसह राज्यात थंडीचा पारा घसरला
मुंबईत शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा 6 अंशांनी घसरला आहे. आजही मुंबईत तापमानाचा पारा घसरलेला आहे. शुक्रवारी सांताक्रूझमध्ये 14.4 तापामानाची नोंद झाली आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यात थंडीचा पारा खाली आला आहे. थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची हुडहुडी अनुभवायला मिळली आहे. मुंबईत काल गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईत शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा 6 अंशांनी घसरला आहे. आजही मुंबईत तापमानाचा पारा घसरलेला आहे. शुक्रवारी सांताक्रूझमध्ये 14.4 तापामानाची नोंद झाली आहे. मुंबईतील शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा 24 अंश सेल्सियसपर्यंत खाली गेल्यानं मागील दहा वर्षातल्या सर्वात कमी कमाल तापमानची नोंद करण्यात आली आहे.
तर महाबळेश्वरमध्येही पारा कमालीचा घटला आहे. परिणामी दवबिंदू गोठले आहे. त्यामुळे आज सकाळी वेण्णालेक परिसरात चक्क बर्फाची चादर पाहायला मिळाली. परभणीतही तापमान घसरला आहे.
परभणीत 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातही आज सरासरी तापमान 5.1 अशं सेल्सिअस तर पाषाण भागातील 4.7 अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे,