तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुंबईत, ठाकरे-पवारांची भेट घेणार; राजकीय हालचालींकडे लक्ष
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrasekhar rao) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शरद पवार (sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत.
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrasekhar rao) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शरद पवार (sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना फोन करुन मोदींविरोधातील लढ्याला पाठिंबा दिला होता. आज उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव हे शरद पवारांची देखील भेट घेणार आहेत. के चंद्रशेखर राव आज मुख्यमंत्री ठाकरे- पवारांच्या भेटीसाठी मुंबईत येणार आहेत.
सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहेत, असं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के. चंद्रशेखर राव यांना फोन केला होता. फोनवर झालेल्या चर्चेवेळी उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांना 20 फेब्रुवारीला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होतं. संजय राऊत यांच्या वादळी पत्रकार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांना फोन लावल्याने अनेक राजकीय अर्थ काढले जात होते.
केसीआर हे लवकरच मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारणार आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहे. मोदी सरकारच्या व्यक्तीविरोधी धोरणांचा विरोध आणि देशाच्या संघराज्य पद्धतीच्या संरक्षणासाठी केसीआर हे केंद्राविरोधात आंदोलन करणार आहेत. फोनवरील चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.
चंद्रशेखर राव केंद्राच्याविरोधात चांगलेच आक्रमक
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोदी सरकार राज्याच्या विकासासाठी पाठिंबा देत नाही. त्यामुळे त्यांना सत्तेतून खाली खेचणार असल्याचे चंद्रशेखर राव म्हटलं होतं. आम्ही तुम्हाला सत्तेपासून दूर करु आणि आम्हाला मदत करणारे सरकार सत्तेत आणू, असेही चंद्रशेखर राव म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Politics : मोदींविरोधातील लढ्यासाठी ठाकरेंचंही समर्थन, चंद्रशेखर राव उद्या ठाकरे, पवारांच्या भेटीला
पंतप्रधान मोदींना सत्तेपासून दूर करु, आम्हाला मदत करणारे सरकार सत्तेत आणू : के. चंद्रशेखर राव