एक्स्प्लोर
CCTV : निलंबित उपनिरीक्षकाची रेल्वेखाली उडी!
रेल्वे सुरक्षा दलाचे निलंबित उपनिरीक्षक विठ्ठल मेश्राम यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. विठ्ठल मेश्राम यांचे वय 50 वर्षे आहे. गेले तीन दिवस ते सायनच्या टिळक रुग्णालयात बेशुद्धावस्थेत आहेत.
मुंबई : कुर्ला रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
रेल्वे सुरक्षा बलाचे निलंबित उपनिरीक्षक रमेश विठ्ठल मेश्राम यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रमेश मेश्राम यांचे वय 50 वर्षे आहे. गेले तीन दिवस ते सायनच्या टिळक रुग्णालयात बेशुद्धावस्थेत आहेत.
रमेश मेश्राम हे माटुंगा येथे कार्यरत असताना कारशेडमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेत त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. या प्रकरणाबाबत रेल्वे सुरक्षा दलाच्या कुर्ला येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर त्यांची सुनावणी होती. ही सुनावणी संपल्यानंतर काही वेळातच ते बाहेर आले आणि कुर्ल्याच्या फलाट क्रमांक 1 वर येत असलेल्या लोकल समोर त्यांनी उडी घेऊन आत्महऱ्या करण्याचा प्रयत्न केला होता.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement