एक्स्प्लोर

Sushant Singh Suicide | पाटण्याच्या एसपीना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केलं

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी बिहारहून मुंबईत दाखल झालेल्या पाटण्याचे पोलीस अधीक्षक बिनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केलं आहे.

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबईत दाखल झालेल्या बिहार पोलिसांना रोज नवनव्या प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. रविवारी (2 ऑगस्ट) दुपारी मुंबईत दाखल झालेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक (शहर) बिनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वॉरन्टाईन केलं आहे. गोरेगाव येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये असलेल्या गेस्टरुममध्ये त्यांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या हातावर स्टॅम्प मारुन त्यांना या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. बिनय कुमार यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वॉरन्टाईनमध्ये राहावं लागेल.

मात्र यावरुन मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते विनोद मिश्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री महापालिकेचा उपयोग या कामासाठी करीत असून याबाबत आयुक्तांना जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.

तर दुसरीकडे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "आज (2 ऑगस्ट) आयपीएस बिनय तिवारी सरकारी ड्यूटीसाठी पाटणाहून मुंबईत दाखल झाले, पण रविवारी रात्री 11 वाजता मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने क्वॉरन्टाईन केलं. विनंती करुनही त्यांना आयपीएस मेसमधील निवासस्थान उपलब्ध करुन दिलं नाही. ते गोरेगांवमधील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते."

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दरदिवशी नवीन ट्विस्ट येत आहेत, नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच मुंबई आणि बिहार पोलिसांच्या तसापावरुनही मतभेद निर्माण झाले आहेत. या प्रकरणात सातत्याने सीबीआय तपासाचीही मागणी होत आहे.

तत्पूर्वी मुंबई पोहोचल्यानंतर मीडियाशी बोलताना विनय तिवारी म्हणाले होते की, आमची टीम मुंबईत चांगलं काम करत आहे. मागील एक आठवड्यापासून जबाब नोंदवला जात आहे. जबाबांच्या विश्लेषणानंतरही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू. मात्र आम्हाला सुशात सिंह राजपूतचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मिळालेला नाही.

तर पाटणाचे एसपी विनय तिवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन म्हटलं की, बिहार पोलिसांनी पाटण्यात गुन्हा दाखल केला असला तरी या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आधीच तपास सुरु केला आहे.

तर दुसरीकडे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित माहिती मुख्यमंत्र्यांना दिली होती. सोबतच बिहार पोलिसांची मुंबईतील उपस्थिती आणि सोशल मीडियावरील अफवांबाबतही माहिती दिली.

संबंधित बातम्या

पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बॅंक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा

सुशांतसिंह प्रकरणाचं राजकारण, तपास सीबीआयकडे देण्याची गरज नाही, मुंबई पोलिस सक्षम - अनिल देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीचRSS : विश्व हिंदू परिषदेचे आठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांना शरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
निळ्या स्विमसूटमध्ये नेहाचा मंडे ब्लूज...
निळ्या स्विमसूटमध्ये नेहाचा मंडे ब्लूज...
Embed widget