एक्स्प्लोर

सुनीत जाधव सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्री

विजेत्या सुनीत जाधवला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह रॉयल एनफिल्ड देऊन गौरवण्यात आलं.

मुंबई : भव्यदिव्य आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा शरीरसौष्ठवपटूंचा मुकाबला आणि मुंबईकर प्रेक्षकांनी भरभरुन दिलेली दाद... महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच विजेतेपदाचा 'पंच' मारला. सलग पाचव्यांदा 'महाराष्ट्र श्री'चा किताब पटकवण्याचा मान सुनीतने मिळवला. विजेत्या सुनीतला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह रॉयल एनफिल्ड देऊन गौरवण्यात आलं. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारे महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर यांच्यावर मात करत सुनीतने सलग पाचव्यांदा राज्य अजिंक्यपद राखलं. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवलं, तर फिजीक स्पोर्ट्स प्रकारामध्ये पुणेकरांनी बाजी मारली. पुरुषांमध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे विजेती ठरली. मुंबईने सांघिक विजेतेपदावर तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला. शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीतील फुललेलं पीळदार सौंदर्य पाहिल्यानंतर रविवारची अंतिम फेरी ब्लॉकबस्टर होणार, याचा अंदाज बांधला जात होताच. मुंबईत वांद्रे पूर्वेला असलेलं पीडब्ल्यूडी मैदान संध्याकाळी पाच वाजताच खचाखच भरलं होतं. कृष्णा (महेश) पारकर यांनी अभिनव फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने शरीरसौष्ठवाचा राज्य सोहळा साकारला होता. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससाठी दहा गटातील विजेते मंचावर आले तेव्हाच प्रेक्षकांमधून फक्त 'सुनीत... सुनीत...'चाच आवाज येत होता. अंतिम लढतीत सुनीत हा महेंद्र चव्हाण आणि अतुल आंब्रेवर मात करुन सलग पाचव्यांदा बाजी मारणार, हा विश्वास जमलेल्या बहुसंख्य प्रेक्षकांच्या जयघोषातून जाणवत होता. फिजीक स्पोर्ट्समध्ये पुणेकर अव्वल मुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंनी मुख्य स्पर्धा गाजवली असली तरी फिजीक स्पोर्ट्स प्रकारात पुणेकर सरस दिसले. पुरुषांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात पुण्याच्या रोहन पाटणकरने सुवर्णमयी कामगिरी केली. त्याच्याच जिल्हयाचा किरण साठे दुसरा आला. तिसरे स्थान मुंबईकर रोहन कदमने मिळवलं. महिलांच्या मॉडेल स्पोर्ट्स प्रकारात पुण्याचीच स्टेला गौडे अव्वल आली. तिने मुंबईच्या डॉ. रिता तारीला मागे टाकून सुवर्ण जिंकले. पुण्याची आदिती बंग तिसरी आली. 'मुंबई श्री'ची 'ठाणे श्री'वर मात 85 किलो वजनी गटातही गटविजेतेपदासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात मुंबई श्री झालेल्या सुजन पिळणकरची गाठ ठाणे श्री अजय नायरशी पडली. या दोघांतही पंचांनी कंपेरिजन केली आणि आपला कौल सुजनच्या बाजूने दिला. मुंबई श्रीमध्ये उपविजेत्या ठरलेल्या सकिंदर सिंगला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं तर रोहित शेट्टी तिसरा आला. सुनीत जाधव सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्री महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल 55 किलो वजनी गट : 1. संदेश सकपाळ (मुंबई उपनगर), 2. नितीन शिगवण (मुंबई उपनगर), 3. ओमकार आंबोकर (मुंबई), 4. राजेश तारवे (मुंबई), 5. कुतुबुद्दीन (कोल्हापूर). 60 किलो वजनी गट : 1. नितीन म्हात्रे (प. ठाणे), 2. विनायक गोळेकर (मुंबई), 3. तेजस भालेकर (मुंबई), 4. संदीप पाटील (ठाणे), 5. बप्पन दास (मुंबई उपनगर). 65 किलो वजनी गट : 1. श्रीनिवास वास्के (पुणे), 2. आदित्य झगडे (मुंबई उपनगर), 3. प्रतिक पांचाळ (मुंबई उपनगर), 4. फय्याज शेख (सातारा), 5. उमेश पांचाळ (मुंबई). 70 किलो वजनी गट : 1. रितेश नाईक (पालघर), 2. सचिन खांबे (पुणे), 3. विघ्नेश पंडित (मुंबई), 4. अमित सिंग (मुंबई), 5. रविंद्र वंजारी (जळगाव). 75 किलो वजनी गट : 1. सुशील मुरकर (मुंबई उपनगर), 2. समीर भिलारे (मुंबई), 3. अमोल गायकवाड (मुंबई), 4. ऋषिकेश पासलकर (पुणे), 5. स्वप्निल नेवाळकर (पालघर). 80 किलो वजनी गट : 1. सागर कातुर्डे (मुंबई), 2. सुयश पाटील (मुंबई), 3. सुशांत रांजणकर (मुंबई), 4. संदेश नलावडे (पुणे), 5. प्रशांत परब (मुंबई). 85 किलो वजनी गट : 1. सुजन पिळणकर (मुंबई), 2. अजय नायर (ठाणे), 3. रोहित शेट्टी (मुंबई उपनगर), 4. सकिंदर सिंग (मुंबई उपनगर), 5. रोहन धुरी (मुंबई). 90 किलो वजनी गट : 1. सुनीत जाधव (मुंबई), 2. राहुल कदम (पुणे), 3. सचिन डोंगरे (मुंबई उपनगर), 4. योगेश सिलिबेरु (ठाणे), 5. इंदेश पाटील (पुणे). 90-100 किलो गट : 1. महेंद्र चव्हाण (पुणे), 2. महेंद्र पगडे (पुणे), 3. श्रीदीप गावडे (मुंबई), 4. नितीन रुपाले (मुंबई उपनगर). 100 किलोवरील गट : 1. अतुल आंब्रे (मुंबई), 2. अक्षय मोगरकर ( ठाणे), 3. अक्षय वांजळे (पुणे). फिजीक फिटनेस (पुरुष) : 1. रोहन पाटणकर (पुणे), 2. किरण साठे (पुणे), 3. रोहन कदम (मुंबई), 4. हनिफ भक्षे (ठाणे), 5. गौरव यादव (सातारा). स्पोर्टस् मॉडेल (महिला) : 1. स्टेला गौडे (पुणे), 2. डॉ. रिता तारी (मुंबई), 3. आदिती बंग (पुणे), 4. तन्वीर फातिमा हक (पुणे), 5. निशरीन पारिख (मुंबई). सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू : अतुल आंब्रे ( मुंबई) बेस्ट पोझर : श्रीनिवास वास्के ( पुणे) सांघिक उपविजेतेपद : मुंबई उपनगर सांघिक विजेतेपद : मुंबई महाराष्ट्र श्री उपविजेता : महेंद्र चव्हाण (पुणे) महाराष्ट्र श्री : सुनीत जाधव (मुंबई)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget