एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना मंत्र्यांच्या गैरहजेरीवर मुनगंटीवार, पाटील यांचं स्पष्टीकरण
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमधील तणाव समोर आला. यानंतर भाजपच्या मंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
बहिष्कार नाही, अनुपस्थित राहण्याची परवानगी : मुनगंटीवार
शिवसेना मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला नाही. त्यांनी अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली, जी मुख्यमंत्र्यांनी दिली, असं स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, "जीएसटीबाबत जसं सगळ्यांना विश्वासात घेतलं, तसंच आता कर्जमाफीसाठीही घेणार आहोत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे. उद्धव ठाकरे परदेशात आहेत, ते आल्यावर त्यांचं मतही विचारात घेणार आहोत. याशिवाय शेवटच्या शेतकऱ्याचंही मत विचारात घेऊ."
शिवसेना मंत्र्यांनी गैरहजर राहण्याची परवानगी मागितली : चंद्रकांत पाटील
तर शिवसेना मंत्री येऊन गेले असं नाही. मी सगळ्यात आधी आलो होतो. शिवसेनेचे मंत्री आले आणि मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, उद्धवजी इथे नाहीत. त्यांच्याशी बोलून निर्णय घेऊ. त्यामुळे आज आम्ही उपस्थित राहणार नाहीत, असं सांगत त्यांनी बैठकीला गैरहजर राहण्याची परवानगी मागितली. त्यांनी बहिष्कार टाकला असं नाही, ते चुकीचं आहे, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगितलं.
दरम्यान, शेतकरी संपासंदर्भातील सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली होती. पण वेळ न मिळाल्याने चर्चेशिवायच बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर पाच मिनिटांतच शिवसेनेचे मंत्री बैठकीतून बाहरे पडले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement