एक्स्प्लोर

महाराष्ट्रात आणखी एका कोरोना बाधित महिलेची यशस्वी प्रसूती; आईसह बाळ सुखरुप

चेंबूर येथील एसआरव्ही रूग्णालयात कोरोना बाधित असलेल्या एका महिलेची यशस्वी सिझेरियन प्रसूती करण्यात आली. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

मुंबई : चेंबूर येथील एसआरव्ही रूग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. सिझेरियन पद्धतीने ही प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, करोना उद्रेकाच्या परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रसूती केल्याने आई आणि बाळ दोघांनाही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शाहीन शेख (नाव बदललेले) असं या गर्भवती महिलेचे नाव आहे. ही महिला कुटुंबियांसह कुर्लामध्ये राहणारी आहे.

कुटुंबात नवीन पाहुणा येणार यामुळे संपूर्ण कुटुंब उत्साहात होते. परंतु, सरकारी प्रोटोकॉलनुसार या महिलेची 38 व्या आठवड्यात कोविड-19 चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटीव्ह आल्याने महिलेसह कुटुंबियांच्या चिंतेत भर पडली. कुटुंबात कोणालाही कोरोनाचा संसर्ग नसताना शेख यांना लागण झाल्याने कुटुंबीय घाबरून गेले होते. नेमकं काय करावं आणि कुठे जावं हेच त्यांना कळत नव्हते. अशा अवघड परिस्थितीत चेंबूरच्या टिळक नगरातील एसआरव्ही हॉस्पिटलमधील अग्रगण्य स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अंजली तळवलकर यांनी या कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

Corona Update | राज्यात आज 1008 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एकट्या मुंबईत 751 रुग्ण

वेळीच काळजी घेतल्याने धोका टळला कोरोनाची लागण झाल्याने चिंतेच पडलेल्या या कुटुंबियांचे समुपदेशन केल्यानंतर या गर्भवती महिलेला तातडीने एसआरव्ही रूग्णालयात दाखल करण्यात आले. या रूग्णालयात कोविड-19 रूग्णालयात विशेष आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणी या महिलेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. या महिलेला शस्त्रक्रिया खोलीसह सर्व सुविधा उपलब्ध केल्या गेल्या. या महिलेची 28 एप्रिल रोजी सिझेरियन प्रसूती करण्यात आली. ही प्रसूती यशस्वी झाली असून या महिलेने मुलीला जन्म दिला आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अंजली तळवलकर यांच्यासह सहाय्यक सर्जन डॉ. श्रीराम गोपाल आणि भूलतज्ज्ञ डॉ. अवंती भावे यांनी ही प्रसूती यशस्वी केली आहे. बाळ आईच्या संपर्कात येणार नाही, यासाठी तातडीने तिला स्वतंत्र अतिदक्षता विभागात ठेवले आहे. एनआयसीयू विभागाचे प्रमुख डॉ. धीरेन कालवाडिया यांच्या देखरेखीखाली मुलीवर उपचार सुरू आहे.

Lockdown3 | महाराष्ट्रात अंतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली

बाळाला कोरोनाचा संसर्ग नाही यासंदर्भात बोलताना एसआरव्ही हॉस्पिटलमधील अग्रगण्य स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अंजली तळवलकर म्हणाल्या की, शाहीन या कोरोनाबाधित गर्भवती महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली आहे. ही महिला कोरोना संक्रमित असूनही योग्य देखरेखीमुळे तिच्या बाळाला या आजाराचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे गर्भवती महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घाबरून जाऊ नयेत. आतापर्यंत मला अनेक गर्भवती महिला याबाबत वारंवार प्रश्न करतात. या सर्व महिलांना मला हेच सांगायचे आहे की, माता जरी कोरोनाबाधित असली तरी गर्भातील बाळाला याचा संसर्ग होण्याची शक्यता फार कमी आहे म्हणून घाबरू नका. सध्या आईच्या दुधात विषाणूचा पुरावा नाही. हा विषाणू श्वासोच्छवासाच्या थेंबाद्वारे पसरतो हे लक्षात घेता, आईंनी आपले हात धुवावेत आणि मुलांच्या विषाणूचा धोका कमी करण्यासाठी फेस मास्क घालणं गरजेचं आहे. बाळाला बाटलीने दुध पाजताना आईने हात स्वच्छ धुवावेत. याशिवाय गर्भवती महिलांनी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य तो पोषक आहार घेणं गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले.

Lockdown Extension | लॉकडाऊन वाढवल्याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget