एक्स्प्लोर

Corona Update | राज्यात आज 1008 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एकट्या मुंबईत 751 रुग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 106 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 1879 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 1008 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे आज 106 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 1879 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान, आज राज्यात 26 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी पुणे शहरातील 10, मुंबईचे 5, जळगावमधील 3 जण तर पुणे जिल्ह्यातील 1, सिंधुदुर्गमधील 1, भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील 1, ठाणे महापालिकामधील 1, नांदेडमधील 1, औरंगाबाद महापालिका क्षेत्रामधील 1 तर परभणीतील एकाचा समावेश आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मुंबई मुंबईत मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 18 पुरुष तर 8 महिला आहेत. आज झालेल्या 26 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत तर 11 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक जण 40 वर्षांखालील आहे. या 26 रुग्णांपैकी 15 जणांमध्ये (58 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 53 हजार 125 नमुन्यांपैकी 1 लाख 40 हजार 587 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 11 हजार 506 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 63 हजार 26 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 11 हजार 677 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय आकडेवारी (कंसात मृत्यू)

मुंबई महानगरपालिका: 7812 (295) ठाणे: 51 (2) ठाणे मनपा: 438 (7) नवी मुंबई मनपा: 193 (3) कल्याण डोंबिवली मनपा: 179 (3) उल्हासनगर मनपा: 3 भिवंडी निजामपूर मनपा: 17 (1) मीरा भाईंदर मनपा: 135 (2) पालघर: 44 (1) वसई विरार मनपा: 135 (3) रायगड: 26 (1) पनवेल मनपा: 48 (2)

नाशिक: 6 नाशिक मनपा: 35 मालेगाव मनपा: 201 (12) अहमदनगर: 26 (2) अहमदनगर मनपा: 16 धुळे: 8 (2) धुळे मनपा: 18 (1) जळगाव: 34 (11) जळगाव मनपा: 10 (1) नंदूरबार: 11 (1) नाशिक मंडळ एकूण: 365 (30) पुणे: 68 (4) पुणे मनपा: 1176 (92) पिंपरी चिंचवड मनपा: 72 (3) सोलापूर: 7 सोलापूर मनपा: 101 (6) सातारा: 32 (2)

कोल्हापूर: 9 कोल्हापूर मनपा: 6 सांगली: 29 सांगली मिरज कुपवाड मनपा: 1 (1) सिंधुदुर्ग: 2 (1) रत्नागिरी: 8 (1) कोल्हापूर मंडळ एकूण: 55 (3) औरंगाबाद: 2 औरंगाबाद मनपा: 159 (8) जालना: 3 हिंगोली: 22 परभणी: 1 (1) परभणी मनपा: 2

लातूर: 12 (1) लातूर मनपा: ० उस्मानाबाद: 3 बीड: 1 नांदेड: 0 नांदेड मनपा: 4 लातूर मंडळ एकूण: 20 (2) अकोला: 12 (1) अकोला मनपा: 27 अमरावती: 2 अमरावती मनपा: 26 (7) यवतमाळ: 79 बुलढाणा: 21 (1) वाशिम: 2

नागपूर: 6 नागपूर मनपा: 133 (2) वर्धा: 0 भंडारा: 1 गोंदिया: 1 चंद्रपूर: 0 चंद्रपूर मनपा: 3 गडचिरोली: 0 इतर राज्ये: 27 (3)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 792 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 10 हजार 849 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 45.34 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

संबंधित बातम्या

Coronavirus Zone | केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून झोननिहाय यादी, महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut on Victory Parade Bus:गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? :संजय राऊतRohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रियाRohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेटHingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
Embed widget