आधी हात जोडून बोलू, मग हात सोडून बोलू; विद्यार्थी पालक समन्वय समितीच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा सरकारला इशारा
गेल्या दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. ती लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पालक आणि विद्यार्थ्यांनी भेट घेतली. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांनी फीवाढीचा मुद्दाही राज ठाकरे यांच्यासमोर मांडला.
मुंबई : विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज कृष्णकुंजवर जाऊ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. यासंदर्भात आज विद्यार्थी पालक समन्वय समितीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. जिम व्यवस्थापक, ग्रंथालयाचे संस्थापक, कोळी महिला, मुंबईचे डब्बेवाले आणि मूर्तिकार यांच्यापाठोपाठ आता विद्यार्थी-पालक समन्वय समितीनेही आपल्या समस्या मांडण्यासाठी कृष्णकुंज गाठलं आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. ती लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पालक आणि विद्यार्थ्यांनी भेट घेतली. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांनी फीवाढीचा मुद्दाही राज ठाकरे यांच्यासमोर मांडला. यावर राज ठाकरे यांनी तातडीने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन करून याबाबत निर्णय घ्यावा, असं सांगितलं. याबाबत लवकरच शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा सरकार काढत असून आपण पुन्हा एकदा वर्षा गायकवड यांच्याशी यासंदर्भात चर्चा करू, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे रखडलेले 11वी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरु व्हावी हीच अपेक्षा पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
शाळेत वसूल केली जाणारी फी आणि शाळेच्या मनमानी कारभाराबाबत मुंबईतील शाळेत शिक्षक घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शाळेकडून मनमानी कारभार सुरु असून शाळा फी द्ययाला सुद्धा नकार देत असल्याचे पालकांनी राज ठाकरे यांना सांगितलं. यावर आधी आपण सरकारशी हात जोडून बोलू नाहीतर मग हात सोडून बोलू, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी पालकांना दिलं आहे.
पाहा व्हिडीओ : विद्यार्थी-पालक समन्वय समिती राज ठाकरे यांच्या भेटीला
विद्यार्थी पालक समन्वय समितीसोबतच लॉकडाऊनपासून मागील 8 महिन्यांपासून बंद असलेले छोटे मोठे कोचिंग क्लासेस सुरु करण्याची परवानगी मिळावी, यासाठी महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस मालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शाळा बंद आहेत तरी शिक्षकांचा पगार सुरु आहे, मात्र कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणारे शिक्षक पूर्णपणे बेरोजगार झाले असून कोचिंग क्लासेस सुरु करून ज्ञान देण्याचं काम सुरु करु द्यावं, ही मागणी महाराष्ट्र कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि सरकरच्या इतर मंत्र्याशी बोलून ही मागणी मान्य करू असं आश्वासन राज ठाकरे यांनी या कोचिंग क्लासेस मालकांना दिलं आहे.
वाढीव वीज बिलाबाबत राज्यपालांना निवेदन; शरद पवार, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेईन : राज ठाकरे
राज्यातील जनतेला येत असलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली होती. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनीही माहिती दिली होती.
वीजबिलांचा विषय मनसे लावून धरत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं करत आहे. अदानी, वेस्टची लोकं भेटली. आम्ही बिल कमी करु शकतो मात्र एनईआरसी कमी करावा लागेल. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते सांगतात. परंतु अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यपालांशी बोललो, ते म्हणाले शरद पवारांचा सल्ला घ्या. मी शरद पवारांना भेटणार आहे. हा विषय राज्य सरकारला माहित आहे, मग हे प्रकरण कशात अडकलंय हे कळत नाही. त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्याच संदर्भात पहिलं निवेदन राज्यपालांना भेटून दिलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या :