एक्स्प्लोर

ST Workers Protest : 'सिल्वर ओक' आंदोलन प्रकरण: नागपूरमधून अटक केलेला आरोपी संदीप गोडबोलेला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

ST Workers Protest : शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर झालेल्या आक्रमक आंदोलन प्रकरणातील आणखी एक आरोपी संदीप गोडबोले याला 16 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संदीप गोडबोलेला नागपूरमधून अटक करण्यात आली होती.

ST Workers Protest : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर झालेल्या आक्रमक आंदोलन प्रकरणातील आरोपी संदीप गोडबोले याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी गोडबोले याला किल्ला कोर्टात आज हजर केले होते. 

संदीप गोडबोले याला मुंबई पोलिसांनी नागपूरमधून अटक केली होती. गोडबोले आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या संपर्कात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आज कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी आरोपीकडून त्याचा मोबाइल फोन ताब्यात घ्यायचा असल्याचे सरकारी वकीलांनी म्हटले. आरोपी अॅड. सदावर्ते यांच्या फोनमध्ये व्हॉट्स अॅप कॉल आणि मेसेज होते. हे फोन नागपूरला करण्यात आले. याचा तपास करताना आरोपीचे नाव समोर आले होते, असे सरकारी वकिलांनी म्हटले. 

सरकारी वकिलांनी म्हटले की,  मुख्य आरोपी आणि या आरोपीचे संभाषण पोलिसांना मिळाले आहे. सीसीटीव्ही फूटेजही मिळाले असून दोन्ही आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करायची असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 

आरोपी संदीप गोडबोले हा एसटी कर्मचारी नसून सदावर्ते यांच्यासोबत असणारी व्यक्ती आहे. त्याने एलएलएमचे शिक्षण घेतले असून वकिलीची सनद घेतली नसल्याचेही समोर आले. दरम्यान, मुख्य आरोपी असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून एका प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

आरोपीने काय म्हटले?

आरोपी संदीप गोडबोले याने कोर्टाला सांगितले की, आझाद मैदानात जल्लोष पाहून मी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आमदार निवासला माघारी गेलो. रात्री तेथे थांबून दुसऱ्या दिवशी मैदानात आलो. सदावर्ते यांनी मोबाइल फोन कॉल उचलला नाही. म्हणून व्हॉट्स अॅप कॉल केला असल्याचे कोर्टाला सांगितले.

आरोपीची बाजू मांडण्यासाठी वकीलच नाही

आरोपी संदीप गोडबोलेकडे बाजू मांडण्यासाठी वकील नव्हता. त्यावर माझ्याकडे वकील करण्यासाठी पैसे नसल्याचा मुद्दा आरोपी गोडबोलेने मांडला. न्यायलयाने वकील हवा का अशी विचारणा केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi Live Updates : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi Live Updates Maharashtra : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Sunil Shetty Marathi Dahihandi 2026:  'मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना..' प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत सुनील शेट्टी गोविंदांना म्हणाला...
 'मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना..' प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत सुनील शेट्टी गोविंदांना म्हणाला...
Mumbai-Pune Bullet Train : रेल्वेमंत्र्यांनी केली पुणे-मुंबई बुलेट ट्रेनची घोषणा; म्हणाले, दिवसातून दोनदा मुंबईला वडापाव खायला जा अन् पुण्यात येऊन बाकरवडीही खा; फक्त 48 मिनिटांत होणार प्रवास
रेल्वेमंत्र्यांनी केली पुणे-मुंबई बुलेट ट्रेनची घोषणा; म्हणाले, दिवसातून दोनदा मुंबईला वडापाव खायला जा अन् पुण्यात येऊन बाकरवडीही खा; फक्त 48 मिनिटांत होणार प्रवास

व्हिडीओ

Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Embed widget