एक्स्प्लोर
मुंबईत दादर-माटुंगामध्ये मध्यरात्री ‘ब्लॉक’
ब्लॉकच्या काळात धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते भायखळा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार असून त्या विद्याविहार, करीरोड आणि चिंचपोकळी येथे थांबणार नाहीत.
मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेवरील दादर आणि माटुंगा या रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गांवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने आज म्हणजेच 13 डिसेंबरपासून 18 डिसेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी ब्लॉक जाहीर केला आहे.
ब्लॉकच्या काळात धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते भायखळा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार असून त्या विद्याविहार, करीरोड आणि चिंचपोकळी येथे थांबणार नाहीत.
पहिला ब्लॉक: 13-14 डिसेंबर, अप-डाऊन मार्गावर
कधी? मध्यरात्री 12.50 ते पहाटे 5 वाजेपर्यंत
परिणाम काय? गुरुवार 13 डिसेंबरला रात्री सीएसएमटीहून 11.48 वाजता निघणारी कुर्ला लोकल आणि रात्री 12.31 वाजता निघणारी कुर्ला लोकल रद्द होणार
दुसरा ब्लॉक: 14-15 डिसेंबर, अप-डाऊन मार्गावर
कधी? मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत
परिणाम काय? शुक्रवार 14 डिसेंबरला रात्री सीएसएमटीहून 11.48 वाजता निघणारी कुर्ला लोकल आणि रात्री 12.31 वाजता निघणारी कुर्ला लोकल रद्द होणार
तिसरा ब्लॉक: 15-16 डिसेंबर, अप-डाऊन जलद मार्गावर
कधी? रात्री 11.15 ते पहाटे 6 आणि दादर टर्मिनसवर मध्यरात्री 12.15 ते 4.45
परिणाम काय? शनिवारी रात्री 11 ते 12.30 या वेळेत डाऊन मेल-एक्स्प्रेस फलाट क्रमांक चारवरुन रवाना होतील. भुसावळ-सीएसएमटी-भुसावळ आणि पुणे-सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द होणार.
चौथा ब्लॉक: 16-17 डिसेंबर, अप-डाऊन जलद मार्गावर
कधी? मध्यरात्री 1.15 ते पहाटे 6 आणि दादर टर्मिनसवर मध्यरात्री 12.15 ते 4.45
परिणाम काय? शनिवारी रात्री 11 ते 12.30 या वेळेत डाऊन मेल-एक्स्प्रेस फलाट क्रमांक चारवरुन रवाना होतील. कसारा-कर्जत अप जलद लोकल मुलुंड ते परळ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
पाचवा ब्लॉक: 17-18 डिसेंबर, अप-डाऊन मार्गासह दादर टर्मिनसवर
कधी? मध्यरात्री 12.45 ते 4.30.
परिणाम: सोमवारी रात्री कसारा-कर्जत अप जलद लोकल मुलुंड ते परळ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक काळात सोमवारी सीएसएमटीहून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि मंगळवारी ठाणे-कुर्ला येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement