एक्स्प्लोर
दिवंगत पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेंचा मुलगा सब-इन्स्पेक्टर
दिवंगत विलास शिंदे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी नियुक्तीपत्र दीपेशच्या हाती सुपूर्द केलं.

मुंबई : दिवंगत वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मुलाला पोलीस सेवेत समाविष्ट करुन घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून 25 वर्षीय दीपेश शिंदे याची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिवंगत विलास शिंदे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी नियुक्तीपत्र दीपेशच्या हाती सुपूर्द केलं.
दीपेश शिंदे हा बीएससी-आयटी पदवीधर असून, मलाडमधील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. पोलीस सेवेत दाखल होण्याबाबत पत्र हाती आल्यानंतर त्याने नोकरीला सोडचिठ्ठी दिली आहे.
“माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. पोलीस सेवेत अत्यंत झोकून देऊन काम करताना वडिलांना पाहिलंय. मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि पोलीस सेवेत माझं सर्वोत्तम काम करेन.”, असं दीपेशने मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
https://twitter.com/CPMumbaiPolice/status/903560015838978048
काय आहे प्रकरण?
23 ऑगस्ट 2016 रोजी खारजवळ वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांनी 17 वर्षीय मुलाला हेल्मेटशिवाय गाडी चालवताना पकडलं. त्याच्याकडे लायसन्सही नव्हतं. याबाबत चौकशी सुरु असतानाच अल्पवयीन आरोपीने अहमद कुरेशी या आपल्या भावाला बोलावून घेतलं. त्याच्या भावाने मागून विलास शिंदेंच्या डोक्यात रॉडने हल्ला करुन तिथून पळ काढला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र 31 ऑगस्ट 2016 रोजी उपचारादरम्यान शिंदे यांचा मृत्यू झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
