एक्स्प्लोर

रस्ते वेगळे आहेत मात्र मैत्री कायम; याचा अर्थ भाजपसोबत सरकार बनवणार असा नाही; संजय राऊतांची फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

रस्ते वेगळे आहेत मात्र आमची मैत्री कायम आहे, पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही सरकार बनवणार आहोत, असं संजय राऊत फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.

मुंबई : "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेसोबत आमची दुश्मनी नाही. मी देखील अनेक दिवसांपासून हेच म्हणत आहे. आम्ही काय भारत-पाकिस्तान थोडीच आहोत. भेटीगाठी होत असतात. बातचीत होत असते. परंतु राजकीय दृष्ट्या आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. फडणीस यांचं देखील हेच म्हणणं आहे. आपण पाहिलं असेल आमिर खान आणि किरण राव यांचे रस्ते वेगळे झाले, मात्र मित्र कायम आहेत. आमचंही तसंच आहे. रस्ते वेगळे आहेत, मात्र मैत्री कायम आहे. आगामी काळात देखील आमची मैत्री कायम राहील. मात्र याचा अर्थ हा नाही की, आम्ही सरकार बनवण्यासाठी जात आहोत. परिस्थिती आत्ता काय आहे आणि उद्या काय असेल याचं भविष्य कोणीच सांगू शकत नाही. माझ्यापेक्षा जास्त माहिती देवेंद्र फडणवीसांकडे असते. या क्षणी महाराष्ट्रात जे सरकार आम्ही बनवलं आहे ते उत्तम सुरु आहे. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार", अशा प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "शिवसेनेशी आमचं कोणतंही शत्रुत्व नाही. आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी आमचा हात सोडला आणि ज्यांच्याविरोधात आम्ही लढलो, त्यांचाच हात शिवसेनेनं पकडला. म्हणूनच आमच्यात मतभेद निर्माण झाले आहेत." फडणवीसांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. 

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारी पत्रकार परिषद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळली या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, "भविष्यात मुख्यमंत्री नक्कीच पत्रकारांसोबत बोलतील. कोरोनाची एकंदरीत परिस्थिती पाहता ते गर्दीत जात नसावेत." मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, "मोहन भागवत यांनी जे सांगितलं आहे ते बरोबर आहे. आपल्या सर्वांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे धर्माचा आणि जातीचा विषय येत नाही. आम्ही भागवत यांच्या मताशी सहमत आहोत. 

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहिलं आणि नितिन गडकरी यांच्या साखर कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, "नितीन गडकरी यांच्या साखर कारखान्याबाबतच्या प्रकरणाची मला माहिती नाही. ज्याबाबत माहिती नाही त्याबाबत शिवसेना बोलत नाही. आरोप प्रत्यारोपांचे धंदे शिवसेना करत नाही. मात्र आमच्या पिंपरी चिंचवडच्या एका पदाधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घोटाळ्याची पोलखोल केली आहे. त्या कंपनी बाबत सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. त्याबाबत आमच्या पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. त्यांच्याजवळ सर्व माहिती आहे."

आज होणाऱ्या अधिवेशनाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "विरोधीपक्ष अधिवेशन होऊ देत नाहीत. हे त्यांचं अपयश आहे. आम्हाला वाटतंय की उलट 2 दिवस व्यवस्थित अधिवेशन पार पडावं. आम्हाला वाटतंय महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या प्रश्नबाबत व्यवस्थित चर्चा व्हावी. तुम्ही दबाव टाकण्यापेक्षा काय करायला हवं याबाबत बोला. तुम्ही केवळ गोंधळ करणार असाल तर नाही राज्य चालेल नाही देश चालेल. ही बाब मी नाही मोदी म्हणतात."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Embed widget