एक्स्प्लोर
Advertisement
मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, शिवसेना नगरसेवकाला अटक
हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मनसे विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक राजू कांबळे यांना प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रबाले पोलिसांनी अटक केली आहे. ऐरोलीमधील मनसे विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांच्यावर राजू कांबळे आणि त्याचा भाऊ संतोष दळवी यांनी डोक्यात लोखंडी रॉड घालून हल्ला केला होता.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विश्वनाथ दळवी यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
ऐरोली गावात नगरसेवक राजू कांबळे यांच्या वॉर्डात गटाराचे काम सुरु होते. कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आक्षेप विश्वनाथ दळवी यांनी घेतला होता. आपल्या कामात नाक खुपसल्याचा राग ठेवून दळवींवर कांबळेंनी हल्ला केला.
याच वेळी दळवी यांच्या कुटुंबीयांनाही धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यामुळे नगरसेवक राजू कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे, विनयभंग करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून रबाले पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
बातम्या
राजकारण
Advertisement