एक्स्प्लोर
'बीकेसी'वर शेवटची प्रचारसभा शिवसेनेची की भाजपची?
मुंबई: मुंबईतील बीकेसी ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरून आता शिवसेना- भाजप आमने- सामने उभे ठाकले आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे.
या सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेने MMRDA ला 12 जानेवारीला पत्र दिलं आहे. मात्र या ठिकाणी भाजपच्या सभेला परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला आहे.
सभेसाठी शिवसेनेला परवानगी न मिळाल्यास भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार कारण्याचा इशारा आमदार अनिल परब यांनी दिला.
काही झालं तरी शिवसेनेची शेवटची सभा बीकेसी ग्राऊंडवरच होणार असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
भाजपला पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकरत असल्याचं परब म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement